Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लवकरच उघड होणार काळ्या पैशाची माहिती

Webdunia
शनिवार, 5 सप्टेंबर 2015 (12:20 IST)
भारतीय नागरिक आणि कंपन्यांचे जवळपास 600 खाते एचएसबीसीच्या जिनेव्हा येथील शाखेत आहेत. या खात्यातील माहिती लवकरच मिळणार आहे. यातून आपोआपच भारतीयांच्या काळ्या पैशाचा पर्दाफाश होण्यास मदत मिळणार असल्यामुळे भारत काळ्या पैशाच्या अगदी निकट पोहोचला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
स्वीत्झर्लडच्या सरकारने कर गुन्हेगारीशी संबंधित चौकशी करणार्‍या दुसर्‍या देशांना मिळणारी माहिती आणि आकडेवारीसंदर्भात सहकार्य करण्यासाठी आपल्या कायद्यात बदल करण्यासंबंधीचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, यासाठी या प्रकरणाशी संबंधित तपशील प्रशासकीय चॅनल किंवा सार्वजनिक सूत्रांच्या माध्यमातून पुढे आला पाहिजे. स्वीत्झर्लड सरकारने घेतलेल्या या भूमिकेमुळे काळ्या पैशासंबंधी भारताने घेतलेल्या भूमिकेला मदतच मिळेल.
 
स्वीत्झर्लड संघ परिषदेने यासंबंधी एका विधेयकाला मंजुरी दिली आहे. ही स्वीत्झर्लड सरकारचे धोरण निश्चित करणारी प्रमुख शाखा आहे. यावर सार्वजनिक विचारविनिमय झाल्यानंतर संसदेत चर्चा होऊ शकते. हा प्रस्ताव भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भारतातील अनेक नागरिक आणि कंपन्यांनी स्वीस बँकांत काळा पैसा ठेवलेला आहे. भारत प्रामुख्याने याचीच चौकशी करीत आहे. एचएसबीसीच्या जिनेव्हा शाखेतही बर्‍याच भारतीयांचे खाते आहेत. ही यादी बँकेच्या एका माजी कर्मचार्‍याने चोरली आहे. ही यादी फ्रान्सीसी सरकारजवळ पोहोचली आहे. या माध्यमातून भारताला यादी मिळाली आहे. स्वीत्झर्लडच्या कायद्यात चोरून दिलेल्या आकडय़ाच्या आधारावर चौकशीला सहकार्य करण्यास परवानगी देण्याची तरतूद नाही. त्यामुळे द्विपक्षीय करार असूनही केवळ त्याच मुद्द्यावरून स्वीत्झर्लडमधील अधिकारी भारताला त्यासंबंधीची माहिती देऊ शकत नाहीत. 
 
मात्र, भारत या खातेदारांसंबंधी स्वतंत्र प्रमाण सादर करीत असेल, तर स्वीत्झर्लड यासंबंधीची माहिती द्यायला तयार आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments