Festival Posters

गंभीर-मनोज तिवारी पुन्हा भिडले

Webdunia
शनिवार, 29 एप्रिल 2017 (08:31 IST)
नाईट रायडर्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट संघांमधील सामन्यादरम्यान दोघे एकमेकाला भिडले. पंचांनीच मग प्रकरण हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली. बंगालचा कर्णधार मनोज तिवारी आणि गंभीरचे संबंध आधीपासूनच बिघडलेले आहेत. २0१५ साली बंगाल आणि दिल्लीमधील रणजी सामन्यादरम्यान गंभीर आणि तिवारीची खडाजंगी झाली होती आणि प्रकरण हातघाईवर गेले होते. बंगालचा फलंदाज पार्थ सारथी भट्टाचार्य बाद झाल्यावर मनोज तिवारी फलंदाजीला आला. तो चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला. गोलंदाज धावत येत असताना तिवारीने त्याला रोखले. त्याने ड्रेसिंग रूमकडे पाहून हेल्मेटची मागणी केली. यामध्ये वेळ गेला. दिल्लीच्या खेळाडूंना वाटले तिवारी वेळ काढतो आहे. तो तिवारीजवळ आला आणि त्याने अर्वाच्च शब्दांचा वापर करायला सुरुवात केली. एका वृत्तसंस्थेने तर वृत्त दिले की, गंभीर तिवारीला म्हणाला, संध्याकाळी भेट तुला माझा इंगा दाखवतो. तिवारीनेही त्याला तोडीस तोड उत्तर देत आव्हान केले. संध्याकाळपर्यंत कशाला थांबतोस आताच फैसला करुया. त्यावेळी पंच श्रीनाथ यांनी हस्तक्षेप केल्यावर गंभीरने त्यांनाही धक्का दिला.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

भारतावर दक्षिण आफ्रिकेचा ६ गडी राखून विजय, मालिकेत १-० अशी आघाडी

स्मृती मंधानाने इतिहास रचला, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला

KKR vsGT: गुजरात ने विजयांची हॅटट्रिक साधली, कोलकाता पाचव्यांदा पराभूत

आयपीएल २०२६ मध्ये आणखी एका दक्षिण आफ्रिकी यष्टीरक्षकाचा प्रवेश, गुजरातला बदली खेळाडू सापडला

MI vs PBKS : पंजाबचा मुंबईवर सात गडी राखून दणदणीत विजय

पुढील लेख
Show comments