Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हैदराबादपुढे आज बंगळुरूचे विराट आव्हान

Webdunia
सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (15:33 IST)
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचे आयोजन इतिहासात भारताबाहेर दुबईत करण्यात येणार आहे. 13 व्या सीझनमध्ये आयपीएलधील संघ सनरायझर्स हैदराबाद तिसर्यांदा या किताबावर नाव कोरण्यास सज्ज आहे. या प्रयत्नात संघाची कमान 2016 रोजी विजेतेपद पटकावणार्यार डेविड वार्नरच्या हातात आहे. दोन वर्षांनी सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा एकदा विड वार्नरकडे सोपवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतली आहे. डेविड वॉर्नरला 2018 मध्ये बॉल टेंपरिंग प्रकरणातील विवादांमुळे संघाचे कर्णधारपद गमवावे लागले होते.
 
परंतु, गेल्या सीझनमध्ये वॉर्नरने जबरदस्त खेळी करत संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. 2016 मध्ये वॉर्नर कर्णधार असताना सनरायझर्स हैदराबादने विजेतेपदाचा मान मिळवला होता.
 
सनरायझर्स हैदराबादसाठी खेळणारा ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेविड वॉर्नर गेल्या सीझनमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. वॉर्नर यावर्षीही कमाल करू शकतो. टी 20 क्रिकेटच्या 282 सामन्यांमध्ये आठ शतक ठोकत 9 हजार 276 धावा करणारा वॉर्नर यावर्षी टी 20 मध्ये आपल्या 10 हजार धावा पूर्ण करू शकतो. आयपीएलच्या 126 सामन्यांमध्ये वॉर्नरच्या नावावर 142.39 चा स्ट्राइक रेटसह 4,706 धावा आहेत. यामध्ये चार शतके आणि 44 अर्धशतकांचा समावेश आहे.
 
दरम्यान, या सीझनमध्ये सनराझर्स हैदराबादने शिखर धवनला संघात स्थान दिलेले नाही. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादकडे मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार आणि विजय शंकर यांसारखे खेळाडू आहेत. तर राशिद खान, बेअरस्टो आणि केन विलियम्सन यांसारखे विदेशी खेळाडू आहेत.
 
आयपीएल स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक संघ म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. या संघात कर्णधार विराट कोहली, एबी डी'व्हिलियर्स, युजवेंद्र चहल यांच्यासारख्या उत्कृष्ट खेळाडूंचा समावेश आहे. या संघाकडून चाहत्यांना नेहमीच खूप अपेक्षा असतात. मात्र, चाहत्यांच्या या अपेक्षा बंगळुरूला पूर्ण करता आलेल्या नाहीत. बंगळुरूला अजून एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाही. कोहली आणि एबी हे गेली अनेक वर्षे बंगळुरू संघाचा भाग आहेत. त्यामुळे या संघाला प्रत्येक मोसमाआधी जेतेपदाचे दावेदार मानले जाते. यंदाचे चित्रही काही वेगळे नाही. यंदाही चाहत्यांना बंगळुरू संघाकडून बर्या च अपेक्षा आहेत.
 
आयपीएलच्या मागील मोसमात हा संघ आठव्या स्थानावर म्हणजेच तळाला राहिला होता. याचे प्रमुख कारण म्हणजे गोलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आणि फिनिशरची कमतरता. यावर तोडगा म्हणून मागील वर्षीच्या अखेरीस झालेल्या खेळाडू लिलावात बंगळुरूने क्रिस मॉरिस, एरॉन फिंच, इसुरु उदाना यांसारख्या परदेशी खेळाडूंना खरेदी केले.
 
फिंचने सलामीवीराची भूमिका पार पडल्यास कोहली किंवा एबी यांच्यापैकी एकाला मधल्या फळीत खेळता येऊ शकेल आणि ते फिनिशर म्हणूनही खेळतील. तसेच अष्टपैलू मॉरिस हा अखेरच्या षटकांत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांत चांगली कामगिरी करेल, अशी बंगळुरूला आशा आहे.
सामन्याची वेळ : सां. 7.30

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

IND vs AUS: शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही, पुढील दोन कसोटींसाठी अनफिट घोषित

IND vs AUS: टीम इंडियाच्या संघात मोठा बदल, BCCI ने निर्णय घेतला

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

हरमनप्रीत कौरने इतिहास रचला,हजार धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय कर्णधार ठरली

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर, या दिवशी भारत-पाकिस्तान मेगा मॅच होणार

पुढील लेख
Show comments