Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंजाब आणि राजस्थान संघात आज ‘करो या मरो'चा सामना रंगणार

punjab face
Webdunia
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (13:33 IST)
आयपीएलच्या प्ले ऑफ शर्यतीत घोडदौड करीत असलेले किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात आज (शुक्रवारी) शेख जायेद स्टेडियमवर ‘करो या मरो'चा सामना रंगणार आहे.
 
या दोन्ही संघाला स्पर्धेतील पुढचा प्रवास करण्यासाठी हा सामना जिंकण्याशिवाय अन्य पर्याय नाही. पंजाबने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत आणि सहा जिंकून बारा गुण प्राप्त केले आहेत. हा संघ गुणतालिकेत चौथ्यास स्थानी आहे. राजस्थानने बारापैकी पाच सामने जिंकले आहेत तर सातमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. दहा अंकासह हा संघ सातव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांना प्ले ऑफमध्ये जाण्याची आशा आहे.
 
पंजाबने मागील पाच सामन्यात शानदार प्रदर्शन केले आहे. लगोपाठ पाच विजय मिळवून  त्यांनी स्पर्धेतील आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. जर त्यांनी उर्वरित दोन सामने जिंकले तर हा संघ प्ले ऑफमध्ये जाऊ शकतो. राजस्थानसाठी मात्र हा रस्ता तितकासा सोपा नाही. या संघाला दोन्ही सामने तर जिंकावे लागतीलच, शिवाय पंजाब, कोलकाता नाइट राडर्स आणि सनराइजर्स हैदराबादांच्या पराभवावर देखील अवलंबून आहे.
 
राजस्थानने मगच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघावर मात केली होती. मुंबईविरुद्ध बेन स्टोक्सने जो फॉर्म दाखवला तो पंजाबसाठी डोकेदुखी ठरू शकतो. संजू सॅमसननेही त्याला उत्तम साथ दिली होती. राजस्थान या दोन्ही फलंदाजांकडून हीच अपेक्षा ठेवून आहे. शिवाय सलामीचा फलंदाज रॉबिन उथप्पाला सूर सापडावा अशीही आशा आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथ  आणि जोस बटलर हेदेखील चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहेत. राजस्थानच्या गोलंदाजांनी मुंबईविरुद्ध निराश केले होते.
 
राहुल आणि ख्रिस गेल सातत्याने धावा काढत आहेत. मनदीप सिंहने गेल्या सामन्यात शानदार अर्धशतकीय खेळी करीत संघाला विजय मिळवून दिला होता. निकोलस पुरनलाही सूर सापडला आहे. पंजाबच्या सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. राजस्थानला कमी धावसंख्येत रोखू शकतील.
सामन्याची वेळ सायंकाळी
7.30 वाजता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

MI vs KKR: मुंबई संघ पराभवाची मालिका थांबवण्यासाठी तिसऱ्या सामन्यात कोलकाता विरुद्ध खेळेल

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या

भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार,मालिकेचे वेळापत्रक जाहीर

दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्सवर 7 गडी राखून विजय मिळवला

RR vs CSK: ऋतुराजची मेहनत वाया गेली, चेन्नईला हरवून राजस्थानने विजयाचे खाते उघडले

पुढील लेख
Show comments