Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IPL 2023 DC Vs RR : : यशस्वी जैस्वाल आणि बटलरचा गुवाहाटीत हल्लाबोल

Webdunia
शनिवार, 8 एप्रिल 2023 (16:58 IST)
DC Vs RR : इंडियन प्रीमियर लीग 2023 चा 11 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुवाहाटी येथे खेळला जात आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांनी राजस्थान रॉयल्सच्या डावाची सुरुवात केली. 

जोस बटलरचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. त्याने 32 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. बटलरने आतापर्यंत सात चौकार आणि एक षटकार मारला आहे.
 
यशस्वी जैस्वाल 31 चेंडूत 60 धावा करून बाद झाला आहे. मुकेश कुमारने त्याच्याच चेंडूवर झेल घेत त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जैस्वालने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार लगावला.यशस्वी जैस्वालने 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने आतापर्यंतच्या खेळीत 11 चौकार मारले आहेत. त्याच्या या शानदार खेळीमुळे राजस्थान संघाने एकही विकेट न गमावता 80 धावांचा टप्पा पार केला.
 
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाची सुरुवात चांगली झाली. यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर ही सलामीची जोडीने गुवाहाटीत हल्लाबोल केला.
 
दोन्ही संघ-
राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (c/wk), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
सदस्यः नवदीप सैनी, आकाश वशिष्ठ, मुरुगन अश्विन, केएम आसिफ, डोनोवन फरेरा.
 
दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, रिले रुसो, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), एनरिच नोर्टजे, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार.
पर्याय:अमन खान, पृथ्वी शॉ, सरफराज खान, इशांत शर्मा, प्रवीण दुबे.
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LSG vs GT :ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आज लखनौ सुपरजायंट्स गुजरात टायटन्सशी सामना

लखनऊ विरुद्ध गुजरात: पूरन आणि सिराज यांच्यात एक मनोरंजक स्पर्धा असणार, अशी बनवा फॅन्टसी टीम

2 वर्षांनी कर्णधारपद मिळाले, माही चेन्नईला प्लेऑफमध्ये घेऊन जाऊ शकेल का?

चेन्नईला त्यांच्याच मैदानावर कोलकात्याकडून कठीण आव्हानाला सामोरे जावे लागेल

CSK vs KKR: 25वा लीग सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात,प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments