IPL 2023 SRH vs GT Match : IPL 2023 च्या 62 क्रमांकाच्या रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद भिडतील. गुजरातचा संघ हा सामना जिंकल्यास आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरेल. अशा स्थितीत हार्दिक पांड्याचा संघ हा सामना जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावणार आहे.
आता आयपीएलच्या रोमांचक सामन्यांचा टप्पा सुरू झाला आहे. इथून पुढे प्रत्येक सामन्यात विजय-पराजय हे प्लेऑफचे गणित बिघडवतील.
आज (15 मे) गुजरात टायटन्सचा संघ मागील सामन्यातील अपयश विसरून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे.हार्दिक पांड्याच्या संघाने हा सामना जिंकला तर तो प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनेल.
गतविजेत्या आयपीएल चॅम्पियन गुजरात टायटन्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी एक विजय पुरेसा असेल. सनरायझर्सचे 11 सामन्यांत चार विजय मिळवून आठ गुण झाले आहेत. स्पर्धेत टिकण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकणे त्याच्यासाठी महत्त्वाचे असेल.
गेल्या सामन्यात गुजरातला मुंबई इंडियन्सकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र या सामन्यात रशीद खानने बॅट आणि बॉल दोन्हीने अप्रतिम कामगिरी केली पण त्याच्या इतर खेळाडूंना चालता आले नाही. गुजरातचे गोलंदाज सूर्यकुमार यादवला रोखण्यात अपयशी ठरले,
गुणतालिकेत गुजरात अजूनही 12 सामन्यांत 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. मात्र आता त्याला उर्वरित दोन सामन्यांमध्ये जुन्या चुका सुधारून चांगली कामगिरी करावी लागणार आहे.