Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

युझवेंद्र चहल: बुद्धिबळातला शिलेदार ते आयपीएलचा नायक

Webdunia
गुरूवार, 11 मे 2023 (20:23 IST)
राजा, उंट, वजीर यामध्ये हुकूमत गाजवणाऱ्या युझवेंद्र चहलने पट बदलला. बुद्धिबळाच्या पटावरून तो क्रिकेटच्या मैदानात अवतरला.
 
अवघ्या 10 वर्षात युझवेंद्र चहल आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स पटकावणारा गोलंदाज ठरला आहे. 7 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत 4 विकेट्स घेत चहलने आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्सच्या विक्रमाची बरोबरी केली.
 
युझवेंद्र चहलचा जन्म हरिणायातला. चहल लहान असताना बुद्धिबळ खेळत असे. ज्युनियर गटात त्याने भारताचंही प्रतिनिधित्व केलं आहे. बुद्धिबळ आणि क्रिकेट यापैकी एकाची निवड करायची वेळ आली तेव्हा चहलने क्रिकेटची निवड केली.
 
2009 मध्ये U19 कूच बिहार स्पर्धेत 34 विकेट्स पटकावत चहल पहिल्यांदा चर्चेत आला. याचवर्षी चहलने हरयाणासाठी खेळायला सुरुवात केली.
 
2011 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने चहलला आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं. हरभजन सिंग, प्रग्यान ओझा हे अनुभवी फिरकीपटू संघात असल्यामुळे चहलला तीन वर्षात केवळ एक सामना खेळायला मिळाला.
 
2013 हंगामात रिकी पॉन्टिंग मुंबईचे नेतृत्व करत होता. लौकिकाला साजेशी कामगिरी करता येत नसल्यामुळे पॉन्टिंगने हंगामाच्या मध्यातच कर्णधारपद सोडलं.
 
रोहित शर्माकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. रोहित शर्माने ज्या सामन्यात कर्णधार म्हणून पदार्पण केलं त्याच सामन्यात युझवेंद्र चहलला अंतिम अकरात खेळण्याची संधी मिळाली. 24 एप्रिल 2013 रोजी हा सामना झाला होता.
 
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्ससाठी खेळण्याची संधी मिळाली नसली तरी चॅम्पियन्स लीग या आयपीएलच्याच जुळ्या स्पर्धेत चहलने आपली ताकद दाखवली.
 
चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये चहलने केवळ 9 धावा देत 2 विकेट्स पटकावल्या. त्याचा इकॉनॉमी रेटही 7 इतका चांगला होता. मुंबई इंडियन्सला चॅम्पियन्स लीगचं जेतेपद जिंकून देण्यात चहलने निर्णायक भूमिका बजावली होती.
 
बंगळुरूच्या ताफ्यात
2014 हंगामापूर्वी झालेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चहलला 10 लाख रुपये खर्चत संघात घेतलं. बंगळुरुतल्या छोट्या आकाराच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर गोलंदाजी करणं हे खरोखरंच आव्हान आहे.
 
मैदानाचा आकार लहानसा असल्याने फलंदाज चौकार-षटकारांची लयलूट करतात. चहलने चिन्नास्वामी मैदानाला बालेकिल्ला बनवलं आणि पुढची सात वर्ष याच मैदानावर त्याने आपली करामत दाखवली.
 
2014 हंगामात बंगळुरूसाठी चहलने पदार्पण केलं. पदार्पणाच्या लढतीतच चहलने सामनावीराचा पुरस्कार पटकावला. मुरली विजयला बाद करत चहलने आयपीएल स्पर्धेत पहिल्या विकेटची नोंद केली होती.
 
छोटया चणीच्या चहलच्या गोलंदाजीची पिसं काढू असं फलंदाजांना वाटतं. ते त्याच्या गोलंदाजीवर आक्रमण करायला जातात पण त्यांचा हा डाव यशस्वी होत नाही. लेगस्पिनर म्हणून सगळी अस्त्रं भातात असलेला चहल विविध क्लृप्त्या लढवून फलंदाजांना हैराण करतो.
 
चहलच्या गोलंदाजीवर डाऊन द ट्रॅक येऊन मोठा फटका मारायला जातात. चहल आपल्या बोटांची जादू दाखवत चेंडूला फिरकी देतो. विकेटकीपर क्षणार्धात बेल्स उडवतो आणि फलंदाज माघारी परतू लागतो हे चित्र क्रिकेटचाहते वर्षानुवर्ष अनुभवत आहेत. फलंदाजांना फटके खेळताना अवघड जावं अशा टप्प्यावर गोलंदाजी करण्यात चहल वाकबगार आहे.
 
2013 हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या नेतृत्वाची धुरा विराट कोहलीकडे सोपवण्यात आली. गोलंदाजी विभागात कोहलीचा विश्वासू साथीदार ही ओळख चहलने कष्टाने कमावली. विकेट्स पटकावण्याबरोबरच धावांची लयलूट रोखण्यातही चहलने मोलाची भूमिका बजावली आहे.
 
राजस्थान रॉयल्सकडे
सर्वसमावेशक संघ उभारण्याच्या तयारीने लिलावात उतरलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने लिलावात चहलला संघात घेतलं. 27 विकेट्स पटकावत चहलने राजस्थान संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला. चहल आणि रवीचंद्रन अश्विनने राजस्थानच्या फिरकीची धुरा समर्थपणे सांभाळली आहे.
 
तो नशेत होता आणि त्याने मला 15व्या माळ्यावरुन खाली लटकावलं
राजस्थान रॉयल्सच्या एका पॉडकास्टदरम्यान चहलने जीवावर बेतलेला एक किस्सा कथन केला. "हा प्रसंग होता 2013 मधला. मी याबद्दल आधी कुणालाच काही सांगितलं नाहीये. पण मी आता ही गोष्ट सांगतो आहे", असं चहल म्हणाला.
 
"2013 मधली ही गोष्ट आहे. तेव्हा मी मुंबई इंडियन्ससाठी खेळत होतो. बंगळुरूत सामना होता. सामन्यानंतर गेट टू गेदर पार्टी होती. पार्टीत सहभागी झालेला एका खेळाडू दारुच्या नशेत होता. मी त्याचं नाव सांगणार नाही", असं चहलने सांगितलं.
 
तो पुढे म्हणाला, "तो म्हणाला- युवी इकडे ये. तो खूप वेळ मला बघत होता. त्याने मला पंधराव्या माळ्यावरुन खाली लटकावलं. मी त्यांची मान पकडून स्वत:ला वाचवलं. मी हात सोडून दिले असते तर खाली पडलो असतो. त्यावेळी आम्ही सगळे 15व्या माळ्यावर होतो".
 
"तिथे खूप लोक होते. त्यांनी हा प्रकार बघितला आणि माझी सुटका केली. मी बेशुद्ध झाल्यासारखा झालो होतो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण कुठेही जातो तेव्हा परिस्थितीचं भान असणं किती आवश्यक आहे ते माझ्या लक्षात आलं. हा माझ्या आयुष्यातला असा प्रसंग होता जेव्हा मी थोडक्यात वाचलो. तिथे काही चूक झाली असती तर मी खाली पडून मोठा अपघात झाला असता", असं चहलने सांगितलं.
 
हंगामानुसार विकेट्स
2011- खेळला नाही
 
2012- खेळला नाही
2013- 0
2014-12
2015-23
2016- 21
2017- 14
2018- 12
2019- 18
2020- 21
2021- 18
2022- 27
2023- 17*
Published By -Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

IND vs AUS: रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर, हा खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये परतणार

यशस्वी जैस्वालने केली सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी

IND vs AUS: मेलबर्न मध्ये भारताचा कसोटीत 184 धावांनी पराभव, मालिकेत 2-1 अशी आघाडी

अर्शदीप सिंगला ICC पुरुष T20I क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकन मिळाले

जसप्रीत बुमराहने विक्रमांची मालिका केली,असे करणारा दुसरा गोलंदाज ठरला

पुढील लेख
Show comments