Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गिल‍ख्रिस्टने पंजाबला विजयी केले

वेबदुनिया
WD
कर्णधार अँडम गिलख्रिस्टची तडफदार फलंदाजी व त्याने अझहर महामूदसह दुसर्‍या जोडीस केलेली महत्त्वपूर्ण भागीदारी याच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने रॉल चॅलेंजर्स बंगळुरूवर 7 सात गडी राखून खळबळजनक विजय मिळविला.

सहाव्या आयपीएल स्पर्धेतील महत्त्वपूर्ण अशा ट्वेंटी-20 साखळी क्रिकेट सामन्यात बंगळुरूला मुंबई पाठोपाठ पंजाबकडूनही पराभव पत्करावा लागला. त्यामुळे च्यांचा प्ले ऑफ फेरी गाठण्याचा प्रयत्नास जोरदार धक्का बसला आहे. 15 सामन्यातून त्यांचे फक्त 16 गुण झालेले आहेत. पंजाबचे 14 सामन्यातून 12 गुण झाले आहेत. बंगळुरूचा एकच सामना उरला आहे तर हैदराबादचे 2 सामने उरले असून त्यांचेही 16 गुण आहेत.

विजयासाठी 175 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब ठरली. झहीर खानने शॉन मार्शचा (8) त्रिफळा घेतला, परंतु गिलख्रिस्ट आणि महामूद यांनी दुसर्‍या जोडीस 77 चेंडूत 118 धावांची मजबूत भागीदारी केली. उनाडकटने महामूदला (41 चेंडूत 8 चौकार, 1 षटकार 61) टिपले तर मुरलीधरनने धोकादायक डेव्हीड मिलेर (2) याचा त्रिफळा घेतला, परंतु गिल‍‍ख्रिस्ट व आर. सतीश यांनी पंजाबला विजयी केले. सतीशने हेन्रीक्सला स्ट्रेट ड्राइव्हचा चौकार ठोकून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गिलख्रिस्टने या हंगामातील पहिलेच अर्धशतक ठोकले व कर्णधारास साजेशी खेळी करताना 54 चेंडूत 10 चौकार, 3 षटकारासह नाबाद 85 धावा केल्या.

तत्पूर्वी, सलामीचा डावखुरा फलंदाज ख्रिस गेल आणि कर्णधार विराट कोहली यांची अर्धशतके व या दोघांनी दुसर्‍या जोडीस 86 चेंडूत 136 धावांची भागीदारी केल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुध्द 20 षटकात 5 बाद 174 धावा काढल्या. पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले. बंगळुरू संघाने चार बदल केले. मुरली कार्तिक, रवी रामपाल आणि सौरभ तिवारी यांना वगळून अरुण कार्तिक, मुथय मुरलीधरन आणि लोकेश राहुल यांचा संघात समावेश केला. डावखुरा वेगवान जहीर खान या स्पर्धेत प्रथमच खेळत आहे. त्यालाही संघात स्थान मिळाले. पंजाब संघाने ती न बदल केले. प्रवीणकुमार ऐवजी मनप्रित गोनी, हरमितसिंग ऐवजी अजहर महामकूद हे संघात आले. तर मनन वोहरा यान े पोमेरबॅचची जागा घेतली.

पुजारा आणि गेल यांनी सावध सुरुवात केली. 4.1 षटकात 22 धावा झाल्यावर आवानाने पुजारा (19) याला टिपले. गेल व कर्णधार कोहली यांनी 11 षटकात एक बाद 58 अशा धावा केल्या होत्या. जम बसलनंतर या दोघांनी 15 व्या षटकापासून ठोकाठोकी सुरू केली. गेलने 53 चेंडूत 4 चौकार 6 षटकारासह 77 धावा केल्या. आवानाने त्याचा त्रिफळा घेतला. कोहलीने 43 चेंडूवर 6 चौकार 2 षटकारासह 57 धावांची भर घातली. महामूदने त्याला पाचित केले. आवानाने डिव्हिलिअर्स याला टिपले. तर महामूदने राहुलला बाद केले. कोहलीचा झेल संदीप शर्माने घेतला. परंतु तो आवानाचा नोबॉल निघाला. आवानाच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात गेल हा पाय घसरून विकेटवर पडला. त्यावेळी एक प्रकारची हास्य निर्माण झाली. गेलने माईक हसीकडून ऑरेंज कॅप मिळविली. त्याचा 680 धावा झाल आहेत.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments