दिल्ली कॅपिटल्स संघाला इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामात 12 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाविरुद्ध पुढील सामना खेळायचा आहे. या सामन्यात दिल्ली संघ आपला नियमित कर्णधार ऋषभ पंतशिवाय मैदानावर खेळणार आहे.
कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआय ने तिसऱ्यांदा स्लो ओव्हर रेट नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल 1 सामन्यासाठी निलंबित केलं आहे. पंतला निलंबित करण्यासोबतच 30 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
दरम्यान, डीसी संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल या सामन्यात संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी घेत असल्याचे सांगितले.
आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी या सामन्यात अक्षर पटेलची कर्णधारपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयावर रिकी पाँटिंग म्हणाले, गेल्या काही हंगामांपासून तो सातत्याने संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. अक्षरची गणना आयपीएलमधील अनुभवी खेळाडूंमध्ये केली जाते आणि त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचाही भरपूर अनुभव आहे.ऋषभ पंत वर बंदी लावण्यात आली असून अशा परिस्थितीत कोणत्या खेळाडूकडे संघाचे कर्णधारपद सोपवायचे, अशी चर्चा आम्ही संघात आधीच सुरू केली होती. यामध्ये, अक्षरे आम्हाला एक चांगला पर्याय असल्याचे दिसून आले. मला आशा आहे की तो या सामन्यात संघाचे अधिक चांगले नेतृत्व करेल.