Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जडेजाने धोनीच्या हजारो चाहत्यांशी प्रॅन्क केले

Webdunia
मंगळवार, 9 एप्रिल 2024 (15:44 IST)
IPL 2024 चा 22 वा सामना CSK आणि KKR यांच्यात सोमवारी रात्री चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. चेपॉक खेळपट्टीवरील या कमी धावसंख्येच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने 7 विकेट्सने शानदार विजय नोंदवला. हा सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक चाहते एमएस धोनीचे होते.

नेहमीप्रमाणेच एमएस धोनी फलंदाजीला कधी उतरेल असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला होता. शिवम दुबे बाद झाल्यानंतर फक्त धोनीच फलंदाजीला उतरेल असे वाटत होते. दरम्यान, रवींद्र जडेजा ड्रेसिंग रुममधून आल्यावर अचानक शांतता पसरली, पण धोनीच्या हजारो चाहत्यांसोबत केला जाणारा हा एक प्रॅन्क होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

CSK त्यांच्या डावाच्या 17व्या षटकात विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. दरम्यान, शिवम दुबे बाद झाला. आता इथून सीएसकेला विजयासाठी फक्त तीन धावांची गरज होती. अशा परिस्थितीत कोणीही फलंदाजीला उतरले असते तर सीएसकेचा विजय झाला असता, मात्र चाहते धोनी-धोनीच्या घोषणा देत होते. अशा स्थितीत एमएस धोनीने चाहत्यांना निराश केले नाही, परंतु त्याआधी जडेजाने येऊन प्रेक्षकां मध्ये  नक्कीच खळबळ उडवून दिली.

एमएस धोनीच्या आधी रवींद्र जडेजा ड्रेसिंग रूममधून बाहेर आला आणि चाहत्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला की धोनी नाही तर तो बॅटिंग करणार आहे. त्याला पाहताच स्टेडियममध्ये शांतता पसरली. यानंतर डगआऊट ओलांडताच जडेजाने तीव्र यू-टर्न घेतला. यानंतर तिथे बसलेले लोक जोरजोरात हसू लागले. यानंतर धोनी खाली येताच संपूर्ण स्टेडियम धोनी-धोनीच्या जयघोषाने दुमदुमले.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलन्दाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्स ने प्रथम फलंदाजी करून 9 गडी गमावून 137 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर ने 34 धावांची खेळी खेळली. तर सीएसके साठी जडेजाने 4 षटकात 18 धावा केल्या. आणि तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात सीएसके ने 17.4 मध्ये तीन गडी गमावून 141 धावा  करत शानदार विजय नोंदवला. 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

GG W vs UPW W: गुजरातने UP ला सहा गड़ी राखून पहिला विजय मिळवला

IPL Schedule 2025: आयपीएलच्या 18 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर,कोलकाता आणि आरसीबी यांच्यात पहिला सामना

MI W vs DC W : दिल्ली कॅपिटल्सने रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा दोन विकेट्सने पराभव केला

सचिन तेंडुलकर या लीगमध्ये भारताचे नेतृत्व करतील, इतके संघ सहभागी होतील

महिला प्रीमियर लीग आजपासून सुरू, पाच संघांमध्ये जेतेपदाची लढाई,एकूण 22 सामने खेळले जातील

पुढील लेख
Show comments