Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

LSG vs CSK : लखनौने चेन्नईचा आठ गडी राखून पराभव केला

Webdunia
शुक्रवार, 19 एप्रिल 2024 (23:57 IST)
IPL च्या 34 व्या सामन्यात, पाच वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (CSK) लखनौ सुपरजायंट्सचा सामना केला. दोन्ही संघांमधील हा सामना लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळला गेला. गेल्या दोन सामन्यांत पराभव पत्करलेला लखनौचा संघ चेन्नईचा पराभव करून विजयी मार्गावर परतला, तर चेन्नईच्या संघाला विजयाची हॅट्ट्रिक करता आली नाही.

कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर लखनौ सुपरजायंट्सने चेन्नई सुपरजायंट्सचा आठ गडी राखून पराभव केला. लखनौला गेल्या दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते, पण संघाने आपल्या घरच्या मैदानावर विजय मिळवला.

लखनऊसाठी केएल राहुलने 53 चेंडूत 82 धावांची खेळी केली तर डी कॉकने 43 चेंडूत 54 धावा केल्या. रवींद्र जडेजाच्या नाबाद 57 धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात राहुल आणि डी कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी केली, ज्याच्या जोरावर लखनौने एक षटक शिल्लक असताना दोन गड्यांच्या मोबदल्यात 180 धावा करून विजय मिळवला. 
 
पराभवानंतरही चेन्नईचा संघ सात सामन्यांमध्ये चार विजय आणि तीन पराभवांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर लखनऊ संघ, ज्याने सीएसके सारखेच गुण मिळवले आहेत, ते पाचव्या स्थानावर आहेत. . 

Edited By- Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पुढील लेख
Show comments