suvichar

LSG vs CSK : मार्कस स्टॉइनिसने IPL मधील 13 वर्षे जुना विक्रम मोडला

Webdunia
बुधवार, 24 एप्रिल 2024 (18:22 IST)
मंगळवारी चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात आश्चर्यकारक उत्साह होता. जेव्हा CSK ने 210 धावा केल्या होत्या, तेव्हा LSG संघ हे लक्ष्य गाठेल असे कोणालाच वाटले नसेल. पण मार्कस स्टॉयनीसनेच अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. यासोबतच मार्कस स्टाइनिसने आयपीएलमधील 13 वर्षे जुना विक्रमही मोडला आहे. तसेच आयपीएल धावांचा पाठलाग करताना प्रथमच एखाद्या फलंदाजाने एवढी मोठी धावसंख्या उभारली आहे. 
 
 मार्कस स्टॉइनिसने CSK विरुद्ध 124 धावांची नाबाद खेळी खेळली. पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉक आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला असताना तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. स्टॉइनिसने 63 चेंडूत एवढी मोठी खेळी खेळली. याआधी आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना एवढी मोठी खेळी कधीच खेळली गेली नव्हती. 2011 च्या आयपीएलमध्ये पंजाबचा फलंदाज पॉल वाल्थाटीने मोहालीत सीएसकेविरुद्ध नाबाद 120 धावांची खेळी केली होती. तेव्हापासून आजपर्यंत हा विक्रम अतूट होता, मात्र आता तो मोडीत काढण्याचे काम मार्कसने केले आहे. मात्र, भारतीय फलंदाजाबद्दल बोलायचे झाले तर पॉल वॅल्थाटी पहिल्या क्रमांकावर आहे. 

मार्कस स्टॉइनिसला प्रथम फलंदाजीत काही काळ कर्णधार केएल राहुलची साथ मिळाली आणि त्यानंतर देवदत्त पडिक्कलसोबतही त्याने भागीदारी केली. मात्र 88 धावांवर एलएसजीने 3 महत्त्वाचे विकेट गमावल्यानंतर हे लक्ष्य अवघड वाटू लागले. पण निकोलस पुरण ने त्याला काही काळ साथ दिली. पुरणने 15 चेंडूत 34 धावांची शानदार खेळी केली. शेवटी, दीपक हुडाने 6 चेंडूत 17 धावा केल्या आणि मार्कस स्टॉइनिसच्या साथीने आपल्या संघाला विजयाच्या दारात नेले.
 
Edited By- Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अर्जुन आणि सानिया विवाहबंधनात अडकले

सनथ जयसूर्या लवकरच श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडणार

भारत T20 वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचले

IND vs ENG "बुमराह हा या विजयाचा खरा हिरो",संजू सॅमसनने हृदयस्पर्शी विधान केल

IND vs ENG मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बुमराहच्या सहा चेंडूंनी इंग्लंडचा पराभव केला

पुढील लेख
Show comments