Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

WhatsApp : आता व्हॉट्सॲप स्टेटसवर दिसणार जाहिराती

Webdunia
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (15:49 IST)
व्हॉट्सॲप हे सर्वात लोकप्रिय असून जगभरातील लाखो लोक वापरतात. व्हॉट्सॲप आपल्या  नातेवाईकांना संदेश देण्यासाठी आणि इतर लोकांशी जोडलेले राहण्यासाठी वापरतो. आता  कंपनी एका नवीन फीचरची चाचणी करत आहे ज्याच्या मदतीने ती कमाई करू शकते. यामध्ये  व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये जाहिराती दिसतील. 
 
व्हॉट्सॲपच्या ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी व्हॉट्सॲपआपली वैशिष्ट्ये दररोज अपडेट करत असते. हा ट्रेंड पुढे चालू ठेवत कंपनीने अलीकडेच एका नवीन फीचरवर काम सुरू केले आहे. हे नवीन फीचर कंपनीसाठी कमाईचे स्रोत म्हणून काम करेल.
 
आता तुम्ही स्टेटसवर जाहिराती पाहू शकता. व्हॉट्सॲपचे प्रमुख विल कॅथकार्ट यांनी ब्राझिलियन मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या मेसेजिंग सेवेवर जाहिराती समाविष्ट करण्याची योजना केली जात असल्याचे सांगितले. 
 
याशिवाय, कंपनी वापरकर्त्यांच्या प्राथमिक चॅट इनबॉक्समध्ये जाहिराती दाखवणार नाही, असेही अहवालात समोर आले आहे. कॅथकार्टने स्पष्ट केले की जाहिराती फक्त चॅनल आणि व्हॉट्सॲपच्या स्टेटस फीचरवर दाखवल्या जातील.कॅथकार्टने सांगितले की चॅनेल किंवा स्टेटस सारख्या इतर ठिकाणी जाहिराती देखील असू शकतात.
 जे ग्राहक ऍक्सेस साठी पैसे देतात.त्यांच्यासाठी हे उपलब्ध असणार. 
 मेटा अधिकाऱ्याने याची पुष्टी केली आहे की ते सध्या कोणत्याही देशात स्टेटस जाहिरातींची चाचणी घेत नाहीत.
 
इंस्टाग्राम व्यतिरिक्त आता व्हॉट्सॲप देखील जाहिराती सादर करणार आहे. 2012 मध्ये फेसबुकने इन्स्टाग्रामचे अधिग्रहण केल्यानंतर, त्याने जाहिराती दाखवण्यास सुरुवात केली.
2014 मध्ये मार्क झुकरबर्गने $19 बिलियनमध्ये विकत घेतल्यापासून जगभरात 2 अब्जाहून अधिक वापरकर्ते असलेले व्हॉट्सॲप जाहिरातमुक्त आहे. 





Edited by - Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

डंपरची दुचाकी आणि पिकअपला धडक, ५ जणांचा मृत्यू, १२ जखमी

मनू भाकरला बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैद्यकीय मदत कक्ष तयार केला

LIVE: बुलढाण्याच्या पेनटाकळी येथील ग्रामस्थांचे उपोषण संपले

कॅनडामध्ये मोठा अपघात, लँडिंग करताना बर्फाळ जमिनीवर विमान उलटल्याने १९ प्रवासी जखमी

पुढील लेख
Show comments