Festival Posters

जीओचे जबरदस्त प्लॅन : एअरटेल घाबरून कमी केले प्लॅन रेट

Webdunia
सोमवार, 8 जानेवारी 2018 (16:28 IST)
रिलायंस नेहमी प्रमाणे मार्केट तोडले आहे. रिलायंस जीओने पुन्हा नवीन  प्लॅन बाजारात आणत कडवी स्पर्धा निर्माण केली आहे. जीओने  प्लॅन दिले की इतर कंपन्या  प्लॅनच्या किंमती आणि सेवांमध्ये बदल करतात. यामध्ये नवीन वर्षात  जिओने आपले ४ प्लॅन स्वस्त केले आहेत.  प्लॅनमध्ये बदल केल्यामुळे ग्राहक जिओकडे आकर्षित होतील या भितीने एअरटेलनेही नुकतेच आपले ३ प्लॅन्स स्वस्त केले आहेत. यामध्ये एअरटेल ने १९९, ३४९ आणि ४४८ च्या प्लॅनमध्ये बदल केले.  त्यामुळे तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे. इंटरनेटचा जास्त वापर करणाऱ्यांसाठी हे प्लॅन जास्त उपयुक्त ठरतील असा दावा कंपनीने केला आहे.एअरटेल ने केलेले बदल खालील प्रमाणे : 

१९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये किंमतीत कायम १ जीबी डेटा देणार , याबरोबर अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल आणि रोज १०० मोफत मेसेजही मिळणार आहेत. मात्र  या प्लॅनची व्हॅलिडीटी २८ दिवस इतकी आहे.  दुसरीकडे ३४९ च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा दिला जातो. याबरोबरच अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्स तसेच रोज १०० मेसेज मोफत मिळणार आहेत. या प्लॅनची मुदत २८ दिवसांची असून यामध्ये पूर्वी  आधी १ जीबी डेटा मिळत होता.

यामध्ये ४४८ च्या प्लॅनमध्येही एअरटेलने बदल केले आहेत या प्लॅनमध्येही रोज १ जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे. या प्लॅनची मुदत आधी ७० दिवसांची होती. आता ती ८२ दिवसांची करण्यात आली आहे. त्यामुळे आता युजर्सना ८२ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लनमध्येही रोज १०० मेसेज आणि अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल मिळणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

Vijay Hazare Trophy वैभव सूर्यवंशीचा विक्रम झटक्यात उद्ध्वस्थ!

LIVE: मनसे आणि शिवसेना-यूबीटी युतीची औपचारिक घोषणा

Vijay Hazare Trophy विजय हजारे ट्रॉफीत रोहित-विराटची बॅट तळपली

कॉंग्रेसच्या माजी नेत्याचे दु:खद निधन

ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पहिले विधान आले समोर; म्हणाले....

पुढील लेख
Show comments