Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेरोजगार तरुणाकडून अॅमेझॉनला लाखोंचा गंडा

Webdunia

दिल्लीतील एका तरुणाने अॅमेझॉनला लाखोंचा गंडा घातला आहे. पोलिसांनी त्याच्या  घरातून १९ महागडे फोन, १२ लाखांची रोख रक्कम आणि ४० विविध बँकाचे पासबुक जप्त केले.

दिल्लीत राहणाऱ्या  शिवम चोप्रा (२१) या तरुणाने  दिल्लीतल्या विद्यापीठातून त्याने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र नोकरी मिळाली नाही. त्यानंतर त्याने फिल्मी स्टाईलने अॅमेझॉनला लुबाडायला सुरूवात केली. यातून त्याने एप्रिल ते मे महिन्यात जवळपास ५० लाख रुपये कमावल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. शिवम अॅमेझॉनवरून महागडे मोबाईल मागवायचा. त्यांने आतापर्यंत सॅमसंग, अॅप्पल, वन प्लस अशा कंपनीचे १६६ फोन अॅमेझॉनवरून मागवले. दरवेळी तो वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरून आपली ऑर्डर द्यायचा. पत्ताही चुकीचा द्यायचा. जेव्हा मोबाईलची डिलिव्हरी घेऊन डिलिव्हरी बॉय पोहोचायचा तेव्हा पत्ता शोधण्यासाठी त्याला अडचणी यायच्या. डिलिव्हरी बॉय पत्ता विचारण्यासाठी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करायचा, फोन आला की दिलेल्या पत्त्याच्या आसपास असणाऱ्या ठिकाणी डिलिव्हरी बॉयला बोलावून शिवम आपली ऑर्डर स्वीकारायचा.यामुळे कोणालाही शंका यायची नाही. ऑर्डर मिळाल्यानंतर आपल्याला फोनऐवजी रिकामा खोकं आलं असं खोटं सांगून तो रिफंड मागायचा. असं करून त्याने लाखो रुपये कमावले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments