Marathi Biodata Maker

लॅपटॉप, अन्य उपकरण शोधणे झाले सोपे

Webdunia
गुरूवार, 7 जून 2018 (15:34 IST)
डिजीटेक कंपनीने ‘अॅन्टी लॉस्ट वायरलेस ट्रॅकर’हे नवं गॅजेट लॉन्च केलं आहे. ५९५ रुपयांच्या या गॅजेटच्या सहाय्याने केवळ लॅपटॉपच नाही तर हरवलेल्या कार, सायकल किंवा अन्य अनेक वस्तू शोधणं अगदी सहजसोपं होणार आहे. या गॅजेटचा वापर करण्यासाठी केवळ ‘डिजीटेक ट्रॅकर’नावाचं एक अॅप डाउनलोड करावं लागणार आहे. प्ले स्टोअरवर आणि अॅपल स्टोअरवर हे अॅप सहज उपलब्ध आहे. कमाल ३० मीटरपर्यंतच्या रेंजमध्ये हे गॅजेट काम करतं.
 
‘अॅन्टी लॉस्ट वायरलेस ट्रॅकर’हे तीन डिझाइनमध्ये आणि दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हे गॅजेट ‘डिजीटेक ट्रॅकर’या अॅपसोबत पेअर केल्यानंतर कोणत्याही वस्तूवर लावून त्याचा वापर करता येईल. गॅजेटला ब्ल्यूटुथची कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. त्यामुळे अॅपद्वारे हे गॅजेट किती अंतरावर आहे, याची माहिती सहज मिळेल. गॅजेटसोबत एक्स्ट्रा बॅटरी देखील देण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: लैंगिक छळाच्या प्रकरणात फरार असलेले ठाणे महानगरपालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांना कोल्हापूरमध्ये अटक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का, शिंदे सेनेने रायगडमधील 'तटकरेंचा बालेकिल्ला' भेदला

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त २१ नवविवाहित जोडप्यांसाठी मोफत वैदिक सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

LSG vs RCB : लखनौने आरसीबीला नऊ धावांनी हरवले

सामन्यात फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एएफसीने एका खेळाडूवर आणि एका महिला फुटबॉल अधिकाऱ्यावर बंदी घातली

पुढील लेख
Show comments