Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्हॉट्सॲप वर लवकरच येणार आहे हे आश्चर्यकारक फीचर्स, ज्यामुळे बदलणार चॅटिंग करण्याची शैली ...

Webdunia
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 (20:36 IST)
व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी लवकरच नवी वैशिष्ट्ये बाजारात आणणार आहे. वापरकर्त्यांना या वैशिष्ट्यांमुळे अनुभव चांगलाच होणार आहे. तसेच यामुळे वापरकर्त्यांची चॅटिंग करण्याची शैली पूर्णपणे बदलणार आहे.
 
इन्स्टंट मेसेंजिंगअप व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यासाठी उत्कृष्ट वैशिष्ट्ये(फीचर्स) सादर करीत आहे. यात डार्क मोड आणि डिलीट मेसेज सारखे वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त आता व्हॉट्सॲप बऱ्याच फीचर्सवर काम करीत आहे, जे येत्या काळात वापरकर्त्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या व्हॉट्सॲपच्या आगामी खास वैशिष्ट्यांविषयी..
 
व्हॉट्सॲप वर मिळू शकते Rooms ची सुविधा..
फेसबुक ने कोरोना काळात व्हिडिओ कॉलिंगच्या वाढत्या प्रभावाला लक्षात घेऊन मेसेंजरसाठी Rooms फीचर्स सादर केले होते. त्याच बरोबर कंपनी आता या वैशिष्ट्याला आपल्या व्हॉट्सॲपच्या वापरकर्त्यांसाठी लवकरच सादर करणार आहे. या Rooms वैशिष्ट्याच्याद्वारे एकाच वेळी सुमारे 50 50 Whatsapp आणि  Whatsapp Web  व्हॉट्सॲप वेब वापरकर्ते व्हिडिओ कॉल करू शकतील. त्याच बरोबर कंपनीचा असा विश्वास आहे की यामुळे वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
 
Whatsapp Multi Device वैशिष्ट्ये -
व्हॉट्सॲप लवकरच आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन वैशिष्ट्य  सादर करणार आहे, ज्याला मल्टी डिवाइस फीचर असे म्हटले आहे. या वैशिष्ट्यांद्वारे वापरकर्ता एकच खाते चार वेगवेगळ्या हेडसेटने चालविण्यास सक्षम असतील. तरीही डेटा सिंक करण्यासाठी वायफाय वापरणे आवश्यक आहे. या वैशिष्ट्याची माहिती वेब बीटा इन्फोने दिली होती.
 
WhatsApp Emojis -
व्हॉट्सॲप ने अलीकडील लेटेस्ट अँड्रॉइड बीटा व्हर्जनवर 138 नवीन इमोजी सादर केले आहे. यामध्ये शेफ, शेतकरी आणि चित्रकारांच्या इमोजीचा समावेश आहे. तथापि, कंपनीने अद्याप या इमोजींना स्टेबल व्हर्जनसाठी लाँच केले नाही.

Expiring messages फीचर -
व्हॉट्सॲप आपल्या नवीन वैशिष्ट्य Expiring messages चाचणी घेत आहे. हे वैशिष्ट्य व्हॉट्सॲपच्या अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.20.197.4 वर स्पॉट करण्यात आले आहेत. या वैशिष्ट्याद्वारे वापरकर्ता सात दिवसानंतर देखील पाठवलेल्या संदेशांना ऑटो डिलीट करू शकतात. सांगायचे म्हणजे की या पूर्वी हे फीचर डिलीट मेसेजच्या नावाने अँड्रॉइड बीटा प्लॅटफॉर्म वर आढळले होते .
 
व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल बटण -
व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलिंगला उत्कृष्ट बनविण्यासाठी आपल्या प्लॅटफॉर्मवर एक स्वतंत्र बटण जोडणार आहे. या बटणाचा माध्यमातून वापरकर्ता सहजपणे ग्रुप मध्ये व्हिडिओ कॉल करू शकतील. सध्यातरी कंपनीकडून या फीचरच्या लाँचिंगशी निगडित माहिती शेअर केलेली नाही.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments