Marathi Biodata Maker

आता ऑनलाइन व्यवहार करताना डेबिट- क्रेडिट 16 अंकी कार्ड क्रमांक आवश्यक, RBI चा नवा नियम जाणून घ्या

Webdunia
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (11:48 IST)
ऑनलाइन व्यवहार करताना आता दरवेळी डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा 16 अंकी कार्ड क्रमांक टाकणे आवश्यक असेल. RBI च्या नवीन नियमानुसार आता ग्राहकाच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा क्रमांक, मुदत, नाव ही माहिती वेबसाईटवर सेव्ह करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक व्यवहारावेळी 16 अंकी कार्ड क्रमांक आणि इतर माहिती द्यावी लागेल.
 
यापूर्वी डेबिट किंवा क्रेडिट कार्डं वापरून कोणताही ऑनलाइन व्यवहार करताना आपोआप साइटकडून विचारल्यावर डिटेल्स सेव्ह होत होते. जेणेकरून प्रत्येक व्यवहारावेळी 16 अंकी कार्ड क्रमांक आणि इतर माहिती द्यावी लागत नाही परंतू आता आरबीआयने काढलेल्या नव्या नियमानुसार ऑनलाइन व्यापारी, पेमेंट अग्रिगेटर आणि ई-कॉमर्स वेबसाईट्सना ग्राहकाच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा क्रमांक, मुदत, नाव ही माहिती त्यांच्या वेबसाईटवर सेव्ह करता येणार नाही. हा नियम जुलै 2021 पासून लागू होणार आहे. या नियमामुळे आता दरवेळी व्यवहार करताना ग्राहकाला कार्डमध्ये बघून किंवा अंक पाठ असतील तर त्याप्रकारे कार्डाची माहिती भरावी लागणार आहे.
 
RBI चा नवा नियम
 
आरबीआयच्या या नियामामुळे ग्राहकांच्या सुरक्षेत भर पडेल कारण ग्राहकाच्या कुठल्याही कार्डाचे डिटेल्स वेबासाईट्सकडे नसल्यामुळे ग्राहकाचे ऑनलाइन व्यवहार सुरक्षित होतील. ऑनलाईन सायबर गुन्हे प्रचंड वाढत असल्यामुळे हे पाउल उचलण्यात येत आहे. कारण वेबसाईटवर साठवलेली ही माहिती सुरक्षित आहे असं जरी या वेबसाइट्स सांगत असल्या तरीही तो डाटा हॅक करून त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. 
 
अनेकदा हा डेटा इतर कंपन्यांना विकला जाऊ शकतो आणि मग ही कार्ड वापरणाऱ्यांना वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रमोशनल मेसेज येतात. अशा प्रकारे मेसेज करणारे ऑफर देतात आणि अनेकदा याद्वारे ही फसवणूक केली जाते. त्यामुळे हा नियम ग्राहकासाठी हिताचा आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

ईव्हीएमवर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी देखील याच मशीनने जिंकले

ठाकरे बंधूं एकत्र आल्याने फायदा महायुतीचा होणार, रामदास आठवले यांचे विधान

मुंबईत 1000 एकर जमिनीवर 50 हजार घरे बांधली जातील, पियुष गोयल यांचा दावा

LIVE: राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीच्या तारखांची घोषणा

बीएमसी निवडणुकीपूर्वी, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप पक्षात प्रवेश

पुढील लेख
Show comments