बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने सोशल मीडियावरील नाव बदलले आहे. तिने तिच्या पती म्हणजेच रणवीर सिंगच्या नावाऐवजी दुसऱ्याच व्यक्तीच नाव लावले आहे. दीपिकाच्या ट्विटर अकाऊंटचे नाव दीपिका पदुकोण नसून ‘मालती’ असे ठेवले आहे. ‘मालती’ हे नाव दुसऱ्या कोणत्या व्यक्तीचे नसून दीपिकाचे आहे. ‘छपाक’ या चित्रपटात दीपिकाने ‘मालती’ची व्यक्तिरेखा साकारली आहे.
‘छपाक’ चित्रपटाचे कथानक अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल हिच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात दीपिकाने लक्ष्मी अगरवाल हिची भूमिका साकारली आहे. याव्यतिरिक्त दीपिकासोबत विक्रांत मेसी प्रमुख भूमिकेत आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये ‘छपाक’ने १८.६७ कोटींची कमाई केली आहे.