Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एका चुकीमुळे रिकामे होऊ शकतात बँक खाते, याकडे दुर्लक्ष करू नका

Webdunia
एकीकडे भारतात डिजीटल देणंघेणं आणि नेट बँकिंगला प्रोत्साहन देत आहे तेथेच दुसरीकडे डिजीटल देणंघेणं केल्याने फसवणूक होत आहे. वर्ष 2021 पर्यंत देशात डिजीटल देणघेण चार पटीने 
 
वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण हा पर्याय सोयीस्कर असला तरी धोकादायक देखील आहे. कारण मागील काही वर्षात यासंबंधित अनेक प्रकरण दाखल झाले आहे. ज्याने नेट बँकिंग द्वारे बदमाश आपल्या खात्यापर्यंत सहज पोहचल्याची माहिती मिळते. तर जाणून घ्या नेट बँकिंगसाठी काही सुरक्षित गोष्टी:
 
ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी आपल्याला बँकिंग कोणत्याही असुरक्षित WIFI नेटवर्कने वापरणे टाळावे. असे केल्यास आपली माहिती अगदी सहज हॅक करता येते आणि त्यामुळे आपले बँक खाते रिकामे होऊ शकतात. म्हणून बँकिंगसाठी सार्वजनिक नेटवर्क वापरणे टाळावे.
 
नेट बँकिंगसाठी नेहमी वेरिफाइड किंवा विश्वसनीय ब्राउझर वापरावे. आपण एखाद्या अनऑथेंटिक साईटहून एखादे अॅप किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड कराल तर फसवणुकीची शक्यता अजूनच वाढते. कारण यात बग किंवा व्हायस असू शकतं. सोबतच आपल्या मोबाइल किंवा लॅपटॉपमध्ये उत्तम अँटी-व्हायरस प्रॉटेक्शन सिस्टम असावे ज्याने आपल्याला अलर्ट मिळू शकेल. 
 
ऑनलाईन फसवणुकीपासून बचावासाठी सर्वात महत्त्वाचे आहे आपलं पासवर्ड सुरक्षित ठेवणे. आपलं पासवर्ड हॅकर्स हॅक करू शकतात म्हणून वेळोवेळी पासवर्ड बदलत राहणे आवश्यक आहे. आपण पासवर्डमध्ये स्पेशल कॅरेक्टर आणि न्यूमरल सामील करत असाल तर पासवर्ड अधिक सुरक्षित राहतं.
 
आपल्या नेट बँकिंगचे पासवर्ड, ओटीपी, पिन, कार्ड वेरिफिकेशन कोड (CVV) आणि यूपीआई पिन कोणासोबतही शेअर करू नये. आपलं पासवर्ड विसरल्यास त्याची रिकव्हरी देखील काळजीपूर्वक करावी.
 
कोणत्याही फिशिंग ईमेलवर कधीही क्लिक करू नका आणि ऑनलाईन भुगतान करताना नेहमी वन टाइम पासवर्ड (OTP) पर्याय निवडा. याने फसवणुकीची शक्यता कमी होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

ठाणे : वेश्याव्यवसायात अडकल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल, तरुणीची सुटका

नौदलाच्या पाणबुडीला मासेमारीची बोटची धडक दोघांचे मृतदेह बाहेर काढले

LIVE: महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला

पुढील लेख
Show comments