Festival Posters

महाराष्ट्रात देशातील पहिले डिजिटल क्राईम युनिट

Webdunia

देशात प्रथमच  लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसच्या धर्तीवर महाराष्ट्रात देशातील पहिले डिजिटल क्राईम युनिट  कार्यान्वित केले आहे.  कॉपीराईटच्या गोरख धंद्याला आळा घालण्यासाठी हे युनिट सुरु केले आहे.  चित्रपट क्षेत्राप्रमाणेच संशोधन, उद्योग, डिजिटल कंपन्या या क्षेत्रालाही दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या संख्येत आर्थिक फटका बसत असतो त्यामुळे फार मोठे नुकसान तर होतेच मात्र हे धंदे करणारे पकडले जात नाहीत आणि तेच याचा फायदा उचलतात. त्यामुळे आता नवीन सेलला मोठे महत्वप्राप्त झाले आहे.   कॉपीराईट हा शब्द आपल्याला माहीत आहे मात्र त्यातील नुकसान आणि आर्थिक फटका कसा बसतो हे अनेकांना माहित नाही.  चोरीचा अर्थात मसुदा चोरी  हा काळा धंदा वरचेवर सर्वच क्षेत्रांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे युनिट तयार झाले आहे. हे नवीन युनिट सायबर सेलच्या मुख्यालयात हा सेल कार्यान्वित करण्यात आहे. आत या नवीन युनिटअंतर्गत संशयास्पद संकेतस्थळांवर लक्ष  ठेवण्यात येत आहे. आजअखेर या युनिटकडून कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करणार्‍या शंभरहून अधिक संकेतस्थळांना कारवाईबाबतच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.

कॉपीराईटच्या काळ्या धंद्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर अंतर्गत कार्यान्वित करण्यात आलेले डिजिटल क्राईम युनिट हे देशातील पहिले युनिट आहे.  युनिट मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे कार्यान्वित करण्यात आले आहे.संशोधन, चित्रपट, डिजिटल हाऊस याठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉपीराईटचे प्रकार घडतात. त्यातून अनेकांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नाही तर आर्थिक नुकसान सोसावे लागते आता या सर्व चोरीला मोठा आळा बसला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपुरतील महावितरण वीज यंत्रणा बळकट करणार

नीट पेपरफुटीमागील मुख्य सूत्रधारला पी. व्ही. कुलकर्णी याला पुण्यातून अटक

आषाढी वारीसाठी अहिल्यानगर प्रशासन सतर्क,जिल्हा प्रशासनाने मोठी तयारी केली

अमरावती जिल्ह्यात रस्ते अपघातग्रस्तांसाठी पंतप्रधान मदत योजना राबविण्यात आली, १.५ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार मोफत देणार

विदर्भात १५ जूनपासून शाळा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान, शिक्षण विभागाला नोटीस बजावली

पुढील लेख
Show comments