Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

खुशखबर ! आता Flipkart एपावर Free मध्ये बघू शकाल व्हिडिओ, चित्रपट आणि वेब सिरींज

/flipkart-s-free-video-streaming-service-to-take-on-amazon
, मंगळवार, 6 ऑगस्ट 2019 (10:55 IST)
इ-कॉमर्स साईट फ्लिपकार्ट लवकरच आपल्या ग्राहकांसाठी एपवर ऑन डिमांड व्हिडिओ स्ट्रीमिंगची सेवा देणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे फ्लिपकार्टची व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा पूर्णपणे फ्री राहणार आहे. अशात फ्लिपकार्टचा सामना अमेजन प्राइम व्हिडिओ आणि हॉटस्टारशी होणार आहे. 
 
फ्लिपकार्टच्या या सेवेचा फायदा कंपनीचे भारतात 16 कोटी ग्राहकांना होणार आहे. याची माहिती कंपनीने एका बनायात दिली आहे. या सेवेवर कंपनीच्या एका प्रवक्तेने म्हटले की ग्राहकांना ऑनलाईन आणण्यासाठी व्हिडिओ, इंटरनेट आणि मनोरंजनाची महत्त्वाची भूमिका आहे.
 
त्यांनी पुढे म्हटले की फ्लिपकार्टचा सामना अमेजन प्राइम व्हिडिओशी होणार आहे जी एक  शुल्क आधारित सेवा आहे, जेव्हाकी फ्लिपकार्टची व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा पूर्णपणे फ्री राहणार आहे.
webdunia
फ्लिपकार्ट एप वर तुम्ही काय काय बघू शकाल
 
फ्लिपकार्टची व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवेत ग्राहक फिल्म, शॉर्ट व्हिडिओ आणि वेब सीरीज बघू शकतील, पण ही सेवा फक्त एपवरच मिळणार आहे. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचे  यूजर्स याचा आनंद घेऊ शकणार नाही. तसेच कंपनीने ऑरिजिनल कंटेंटेसाठी कुठल्याही पार्टनरसोबत पार्टनरशिपची माहिती अद्याप दिलेली नाही आहे.
 
कंपनीच्या एका बनायात फ्लिपकार्टची व्हिडिओ स्ट्रीमिंगच्या सेवेची टेस्टिंग सध्या कंपनीच्या एकूण ग्राहकांच्या एक टक्के संख्येवर होत आहे, पण पुढील 20 दिवसांमध्ये याला सर्व ग्राहकांसाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेल्वेप्रवास विमानापेक्षा महाग व वेळखाऊ