Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जिओ मार्ट अ‍ॅप लाँच, सामान खरेदीवर एमआरपीपेक्षा पाच टक्के सवलत

Webdunia
शनिवार, 25 जुलै 2020 (10:15 IST)
रिलायन्सचं JioMart अ‍ॅप लाँच झालं आहे. अन्य ऑनलाइन शॉपिंग स्टोअर्सप्रमाणे JioMart द्वारे किराणा आणि अन्य सामानाची शॉपिंग करता येईल. अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी कंपनीने हे अ‍ॅप लाँच केलं आहे. ग्राहक गुगल प्ले-स्टोअर किंवा अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमधून डाउनलोड करु शकतात. जवळपास दोन महिन्यांपूर्वी रिलायन्सने या अ‍ॅपसाठी वेबसाइट लाँच केली होती.
 
200 शहरांमध्ये कंपनीने आपली ही सेवा सुरू केली आहे. सध्या JioMart वर किराणा सामान, पर्सनल केअर, होम केअर आणि बेबी केअर प्रोडक्ट्स ऑर्डर करता येतील. गुगल प्ले-स्टोअरवर याच्या अँड्रॉइड व्हर्जनची साइज 13 एमबी आणि अ‍ॅपल स्टोअर iOS व्हर्जनची साइज 30.7 एमबी आहे. गुगल प्ले स्टोअरवर लाँच झाल्यापासून एक लाखांहून जास्त जणांनी हे अ‍ॅप डाउनलोड केलं आहे.
 
JioMartवर किराणा सामानाच्या खरेदीवर व अन्य अत्यावश्यक सामानावर एमआरपीपेक्षा पाच टक्के सवलत दिली जात आहे. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्विगी झोमॅटो किंवा या क्षेत्रातील अन्य कोणत्याही कंपनीपेक्षा कमी दरात जिओ मार्टवरुन सामान खरेदी करता येईल असा कंपनीचा दावा आहे. तसेच, किमान रक्कमेच्या खरेदीची कोणतीही अट न ठेवता कंपनीकडून सामानाची फ्री डिलिव्हरी दिली जाईल.
 
JioMartचा वापर अ‍ॅपऐवजी जर वेबसाइटवर करायचा असेल सर्वात प्रथम  जिओ मार्टच्या https://www.jiomart.com/ या संकेतस्थळावर जावं लागेल. वेबसाइटवर गेल्यानंतर समोरच एक बॉक्स येईल. त्यामध्ये  एरियाचा पिन कोड टाकावा लागेल. क्षेत्र ग्रीन झोनमध्ये असेल तर तुम्हाला जिओ मार्टची डिलिव्हरी घरपोच मिळेल.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments