Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

JIO चे नवीन धमाल, आता मिळेल ही मोठी सुविधा

JIO चे नवीन धमाल, आता मिळेल ही मोठी सुविधा
, गुरूवार, 18 एप्रिल 2019 (17:02 IST)
रिलायन्स जिओने आता जिओ टीव्ही अँड्रॉइड अॅपचा अपडेटेड व्हर्जन लॉन्च केला आहे. नवीन व्हर्जनसह आता जिओ टीव्ही अॅपमध्ये पिक्चर-इन-पिक्चर सपोर्ट मिळू शकेल. मीडिया अॅपमध्ये पिक्चर-इन-पिक्चर सपोर्ट खूप आवडले जात आहे आणि त्याची मागणी या साठी जास्त असते कारण या फीचरच्या मदतीने कोणत्याही टॉस्क दरम्यान सहजपणे कंटेंट पाहू शकतात. या फीचर्ससाठी आपल्याला जिओ अॅपचा अपडेटेड व्हर्जन डाउनलोड करणे आवश्यक आहे. 
 
आता आपण चॅट, ब्राउझ किंवा इतर गोष्टी करतानाही जिओ टीव्हीचा आनंद घेऊ शकता. गूगलने पिक्चर-इन-पिक्चर मोडला अँड्रॉइड 8.0 ओरिओमध्ये सादर केला आहे. हे एक मल्टी-विंडो मोड आहे ज्याच्या मदतीने वापरकर्ता डिव्हाईसवर कोणत्याही टॉस्क दरम्यान एक लहान विंडोमध्ये व्हिडिओ पाहू शकतात. जिओ टीव्ही अँड्रॉइड व्हर्जन चेंजलॉगमध्ये या व्यतिरिक्त इतर कोणत्याही फीचरबद्दल कोणतीही माहिती नाही आहे. 
 
जिओ टीव्ही हे एक लाइव्ह टीव्ही अॅप्लीकेशन आहे. जिओ टीव्ही अॅप अनेक भाषांमध्ये कंटेंट प्रदान करते. या अॅपला जिओ टीव्ही वापरकर्तेच ऍक्सेस करू शकतात आणि हे Android आणि iOS डिव्हाइसेसवर कार्य करतं. कंपनीच्या मते या अॅपमध्ये डेस्कटॉप कॉम्प्युटरसाठी देखील सपोर्ट केले जाईल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टाटा नॅनोपेक्षा देखील कमी किंमतीत येईल Bajaj Qute, आज होणार लॉन्च