Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सॅमसंगच्या स्मार्टफोनसोबत चार्जर मिळणार नाही

Webdunia
शुक्रवार, 10 जुलै 2020 (10:15 IST)
सॅमसंगच्या एका निर्णयामुळे ग्राहकांना जास्तच धक्का बसणार आहे. या स्मार्टफोनसोबत मिळणारा चार्जर न देण्याचा निर्णय देण्याबद्दल सॅमसंगकडून विचार सुरू आहे. त्यामुळे सॅमसंगच्या नव्या मोबाईल सोबत चार्जर न मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
सॅममोबाईलनं दिलेल्या वृत्तानुसार पुढील वर्षापासून काही स्मार्टफोनसोबत चार्जर न देण्याची योजना सॅमसंगकडून आखली जात आहे. सॅमसंगनं असा निर्णय घेतल्यास पहिल्यांदाच कंपनीचे फोन चार्जरशिवाय विकले जातील. त्यामागील विचार पूर्णपणे आर्थिक असल्याचं बोललं जात आहे. सॅमसंग जगातील सर्वात मोठ्या स्मार्ट फोन निर्मिती कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी दरवर्षी कोट्यवधी फोन्सची विक्री करते. या फोन सोबत चार्जर न दिल्यास कंपनीला आर्थिक फायदा होणार आहे. त्यामुळे फोनचे किंमत कमी होईल त्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांनाही होणारच आहे असा विचार कंपनीकडून सुरू आहे.
 
सध्या जगभरात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्सचे चार्जिंग पोर्ट्स जवळपास सारखेच असतात. सगळ्याच कंपन्या यूएसबी-सी पोर्ट चार्जिंग पोर्ट्सचे फोन तयार करतात. सॅमसंग याच मुद्द्याचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे. चार्जरशिवाय फोन शिकण्याच्या विचारात असलेली सॅमसंग ही पहिली कंपनी नाही. ऍपलकडूनही आयफोन १२ ची सीरिज चार्जरशिवाय बाजारात लॉन्च करण्याबद्दल विचार सुरू आहे.
 
फोन सोबत चार्जर न दिल्याने ग्राहकांची एकीकडे निराशा होणार असली, तरी त्यामुळे फोनचे किंमत कमी होणार असल्यानं ग्राहकांना दिलासाही मिळणार आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments