Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पबजी वर येणार भारतात बंदी येण्य्याची दाट शक्यता. हे त्या गेमला पर्याय असलेलं गेम्स

Webdunia
बुधवार, 29 जुलै 2020 (10:07 IST)
पबजी मोबाइल (PUBG Mobile) भारतात खूप लोकप्रिय आहे. आता कदाचित यावर भारतात बंदी येईल. 200 हून अधिक अ‍ॅप्सची यादी तयार केली जात आहे, ज्यावर बंदी घातली जाऊ शकते. अलीकडेच सरकारने 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली, त्यानंतर त्यांच्या क्लोन अ‍ॅप्सवर कालच बंदी घालण्यात आली. पबजी मोबाईल व्यतिरिक्त असे बरेच गेम आहेत. यापैकी काही गेम पबजी मोबाइलपेक्षा देखील चांगला गेमिंगचा अनुभव देतात. पबजी मोबाइल हा एक ऑनलाइन मल्टी-प्लेअर बॅटल रॉयल गेम आहे. असे इतरही अनेक गेम्स आहेत जे आपल्याला आवडू शकतात.
 
कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल (COD Mobile)
कॉल ऑफ ड्यूटी हा एक जुना गेम आहे. लॉंच झाल्यापासून त्याने बरेच रेकॉर्ड तोडले आहेत आणि भारतासह जगभरात लोकप्रिय झाला आहे. या गेमने डाउनलोडच्या बाबतीत पबजी मोबाइलशी स्पर्धा केली आहे. पण नुकताच तो मोबाइलसाठी लॉंच करण्यात आला आहे. यापूर्वी हा गेम केवळ कम्प्युटर आणि प्ले स्टेशनमध्ये खेळला जात असे. कॉल ऑफ ड्यूटी हा जगातील सर्वोत्तम गेम पैकी एक आहे.
 
फोर्टनाइट (Fortnight)
हा देखील पबजी मोबाईल सारखाच एक गेम आहे, परंतु तो खेळण्याचा मार्ग वेगळा असेल. बर्‍याच प्रकारे तो पबजी मोबाइलपेक्षा चांगला आहे. या गेममध्ये खेळाडूंना स्ट्रक्चर्स बनवावी लागतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा गेम स्मार्टफोन आणि कम्प्युटर या दोन्ही प्लॅटफॉर्मवर खेळला जाऊ शकतो.
 
फ्रीफायर (G arena Free Fire)
हा गेम पबजी मोबाइलशी अधिक मिळता जुळता आहे. यातही लोक पबजी मोबाइलप्रमाणे एकाच वेळी नकाशावर उतरतात. फाईट देखील येथे पबजी प्रमाणेच दिसेल, परंतु हा पबजी मोबाइलपेक्षा ग्राफिक्स आणि अ‍ॅनिमेशनच्या बाबतीत कमी आहे आणि खेळण्यास देखील सोपा आहे.
 
बॅटल लँड्स रॉयल (Battle lands Royal)
हा देखील एक ऑनलाइन मल्टी-प्लेअर गेम आहे ज्यामध्ये केवळ 32 खेळाडू एकाच वेळी सहभागी होऊ शकतात. पबजी मोबाईल प्रमाणे हा गेमही फार मोठा नाही आणि कमी वेळ लागतो. हा खेळ 5 मिनिटांत पूर्ण होऊ शकतो. ग्राफिक्स देखील कमी आहेत, जेणेकरून आपण तो अगदी बजेट स्मार्टफोनवर देखील खेळू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

महाराष्ट्रातील मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने दिले उत्तर

LIVE: पालघरमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप,गुन्हा दाखल

पालघरमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप,गुन्हा दाखल

मेंढरमध्ये लष्कराचे वाहन कोसळले पाच जवानांचा मृत्यू,अनेक जवान जखमी

पुढील लेख
Show comments