suvichar

रिलायन्स कम्युनिकेशन ची २जी मोबाईल सेवा बंद

Webdunia
गुरूवार, 26 ऑक्टोबर 2017 (11:26 IST)

रिलायन्स कम्युनिकेशन ही कंपनी कर्जात बुडाल्यामुळे महिन्याभरात या २जी मोबाईल सेवा बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. मात्र कंपनीची ३जी आणि ४जी सुविधा चालू राहणार आहे. औद्योगिक सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. कंपनीचे कार्यकारी निर्देशक गुरदीप सिंह यांनी याबद्दलच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. ३० दिवसात वायरलेस व्यवसाय बंद करण्यात येणार आहे. 

त्यांनी सांगितले की, आयएलडी वॉयस, कंज्यूमर वॉयस, 4G पोस्टपेड डोंगल आणि मोबाईल टॉवर या सुविधा नफा होईपर्यंत चालू ठेवण्याचा कंपनीचा मानस आहे. याव्यतिरिक्त सर्व व्यवसाय बंद करण्यात येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिंह यांनी सांगितले की, २१ नोव्हेंबरला लायसन्स संपल्यानंतर डीटीएच सेवा देखील बंद केल्या जातील. 

या कंपनीवर ४६ हजार करोडचे कर्ज आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एयरसेलला व्हायरलेस कारभार विकण्याच्या त्यांचा करार देखील असफल ठरला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षा! प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा केली

LIVE: संजय राऊत यांना सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा; १५ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा रद्द

नांदेडमध्ये १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली; ५ जणांविरुद्ध एफआयआर दाखल

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यवतमाळला मोठी भेट दिली, ५७० कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेला मंजुरी

सिक्कीममध्ये दोनदा भूकंपाचे धक्के बसले; लोकांमध्ये घबराट पसरली

पुढील लेख
Show comments