Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जिओचा स्वेदशी व्हिडिओ कांफ्रेंसिंग अॅप JioMeet लाँच, एकाचवेळी 100 यूजर्स मोफत करु शकतात व्हिडिओ कॉल

Webdunia
शुक्रवार, 3 जुलै 2020 (09:05 IST)
रिलायंस जिओचा स्वेदशी अॅप ‍जिओमीट आता यूजर्ससाठी उपलब्ध आहे. रिलायन्स जिओने गुरूवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी JioMeet अ‍ॅप लाँच केलं आहे.
 
JioMeet हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयफोन युजर्ससाठी उपलब्ध झालं असून हे वापरण्यासाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही. हे अ‍ॅप पूर्णतः मोफत असणार आहे. या अ‍ॅपची वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे 100 पेक्षा जास्त यूजर्स एकाच वेळी व्हिडिओ कॉलवर जुळू शकतात. 
 
या अ‍ॅपमध्ये मिटिंग शेड्यूल करणे, स्क्रीन शेअर करणे असेच अनेक फीचर्स आहेत तसेच या अ‍ॅपमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी कोड किंवा इन्व्हाइटची गरज लागत नाही. डेस्कटॉपवरुन काम करणारे युजर्स गुगल क्रोम आणि मोझिला फायरफॉक्स ब्राउझरवरुनही JioMeet चा वापर करु शकतात. तसेच JioMeet अ‍ॅप जवळपास सर्व प्रकारच्या फोनला सपोर्ट करतं.
 
लॉकडाउनमध्ये व्हिडिओ कॉलिंगच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे आता JioMeet हा अजून एक पर्याय युजर्सला मिळाल्याने लोकप्रिय अॅप झूमला भारतीय पर्याय मिळाला आहे. 
 
या प्रकारे करा डाउनलोड-
मोबाइल यूजर्स प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवर JioMeet सर्च करुन डाउनलोड करु शकतात.
डेस्कटॉप यूजर्स https://jiomeetpro.jio.com/home#download या वेबसाइटवर जाउन अॅप्लिकेशन डाउनलोड करु शकतात.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments