Dharma Sangrah

जिओच्या रिचार्जवर गिफ्ट व्हाऊचर

Webdunia

पुन्हा एकदा जिओने आपल्या ग्राहकांसाठी एकाहून एक चांगल्या ऑफर्स आणत ग्राहकांना खूश करण्याचे ठरवले आहे. १० जीबी डेटाचे १० व्हाऊचर तसेच २४८ रुपयांच्या  रिचार्जवर २५०० रुपयांचे गिफ्ट देणार असल्याचे जिओने जाहीर केले आहे.

माय जिओ अॅप मध्ये १० जीबीचे १० वाऊचर मिळणार आहेत. म्हणजेच अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना १०० जीबी डेटा मिळेल. हे वाऊचर ग्राहकांना एक वर्षांच्या आत रिडिम करता येतील. ही ऑफर १० एप्रिलपासून सुरु झाली असून नव्याने जिओचे ग्राहक होणाऱ्यांनाच ही ऑफर मिळू शकेल असे सांगण्यात आले आहे.

याशिवाय आणखी एक आकर्षक ऑफर म्हणजे २४८ रुपयांत २५०० रुपयांची भेटवस्तू मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना कमीत कमी १४९ रुपयांचा पहिला रिचार्ज करणे आणि ९९ रुपयांत जिओची प्राईम मेंबरशीप घेणे आवश्यक आहे. त्यावर ९९९ रुपयांपर्यंतचे मोफत जिओ फाय डिव्हाईस आणि १५०० रुपयांच्या किंमतीचा १०० जीबी अतिरिक्त ४ जी डेटा मिळेल. ही ऑफर गूगल होम किंवा क्रोमकास्ट डिव्हाईस (फक्त भारतीय) च्या खरेदीवर उपलब्ध असेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना रिलायन्स डिजिटल, रिलायन्स डीएक्स मिनी, जिओ स्टोअर डिवाईस खरेदी करता येईल. जिओ प्रीपेड ग्राहकही या ऑफरचा फायदा घेऊ शकतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

Afghanistan-Pakistan: पाकिस्तानी सीमेवर अफगाणिस्तानची मोठी लष्करी कारवाई

दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला

प्राग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत गुकेश आणि निमन यांचा सामना बरोबरीत सुटला

LIVE: सुनेत्रा पवार यांची एनसीपीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड

अजित पवार विमान अपघात प्रकरणात विधान परिषदेच्या अध्यक्षांचे सरकारला तथ्ये सादर करण्याचे निर्देश

पुढील लेख
Show comments