Marathi Biodata Maker

शॉपिंगसाठी आलं जिओफोन गिफ्ट कार्ड

Webdunia
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018 (16:03 IST)
आता रिलायंस जिओने एक फेस्टिव्ह गिफ्ट कार्ड आणलं आहे. ही दिवाळी अजून खास बनावी यासाठी हे कार्ड तुम्ही तुमच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना गिफ्ट करु शकतात. जिओफोन गिफ्ट कार्ड असं या कार्डचं नाव आहे. 1095 रुपये इतकी या कार्डची किंमत आहे, रिलायंस डिजिटल स्टोअर्स किंवा अॅमेझॉनच्या संकेतस्थळावरुनही हे कार्ड खरेदी करता येऊ शकतं. या कार्डच्या माध्यमांतून ग्राहकांना अनेक सेवांचा मोफत लाभ घेता येणार आहे. पण, जिओ फोन खरेदी करण्यासाठी या कार्डचा मुख्य फायदा होईल. 
 
रिलायंस जिओकडून हे गिफ्ट कार्ड Monsoon Hungamaऑफरअंतर्गत जारी करण्यात आलं आहे. या कार्डद्वारे युजर कोणत्याही ब्रँडच्या जुन्या फोनच्या बदल्यात नवा जिओफोन अगदी मोफत खरेदी करु शकतात. यापूर्वी यासाठी ग्राहकांना 501 रुपये खर्चावे लागत होते. तसंच या गिफ्ट कार्डसोबत 594 रुपयांचं स्पेशल रिचार्ज देखील मिळेल. या स्पेशल रिचार्जची वैधता सहा महिन्यांसाठी असेल, तसंच अमर्यादित लोकल, रोमिंग आणि नॅशनल कॉलिंगची सेवा याद्वारे मिळेल. दरदिवशी 500 एमबी हाय-स्पीड 4जी डेटा, म्हणजेच युजरचा एकूण 90 जीबी डेटाचा फायदा आहे. एक्सचेंज बोनस अंतर्गत युजरला 6 जीबी जास्त डेटा मिळेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

नरहरी झिरवाल यांनी स्वतःच आपला वादग्रस्त व्हिडिओ कसा बनवला गेला हे स्पष्ट केले

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २० मे पर्यंत शेतकरी ओळखपत्र बनवणे अनिवार्य

LIVE: मिसिंग लिंक' प्रकल्पाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

मिसिंग लिंक' प्रकल्पाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, दररोज १ कोटी रुपयांच्या इंधनाची बचत होणार

RR vs DC : राजस्थानने नाणेफेक जिंकून दिल्लीविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला; दोन्ही संघांचे प्लेइंग ११ जाणून घ्या

पुढील लेख
Show comments