Marathi Biodata Maker

'टिकटॉक'ला शिल्पा शेट्टी देणार टक्कर !

Webdunia
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (14:08 IST)
साधारण एका महिन्यापूर्वी भारताने टिकटॉक, पबजी, बिगोसह 100 हून अधिक चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे. या नंतर बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने पबजी प्रेमींसाठी पर्याय म्हणून भारतीय 'फौ-जी' तयार करणार असल्याचे म्हटले होते. आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा (Shilpa Shetty) आणि तिचा नवरा राज कुंद्रा (Raj Kundra) हे देखील टिकटॉकला टक्कर देणाऱ्या भारतीय लाईव्ह स्ट्रीमिंग अॅापची (app launch)निर्मिती करत असल्याचे कळते आहे.
 
स्वतः राज कुंद्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, 'जेएल स्ट्रीम हे अनेक वैशिष्ट्यांसह बनविलेले भारतीय लाईव्ह स्ट्रीमिंग अॅचप आहे. काही चिनी अॅप्स भारतात बंदी असूनही सर्व्हर सुरू ठेवून आणि मिकोचे मिका असे नाव बदल करून सर्रास भारतात वापरले जात आहेत. चीनी अॅप्सवर बंदी असल्याने ते हाँगकाँगचे असल्याचा दावा करतात. अशा अपराधींना शिक्षा झाली पाहिजे. भारतीयांनी अशा अॅप्सना प्रोत्साहन न देता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे'.
शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा याचे हे नवे अॅप www.jlstream.com वर चीन वगळता संपूर्ण जगभरात उपलब्ध होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

World Wildlife Day जागतिक वन्यजीव दिन

यमुना एक्सप्रेसवेवर मोठा अपघात, सहा जणांचा मृत्यू

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुबईत अडकलेल्या मराठी नागरिकांशी संवाद साधला

सौदी अरेबियातील अमेरिकन दूतावासावर मोठा हल्ला, अमेरिकन लोकांना आखाती देश सोडण्याचा सल्ला

मुंबई आणि पुण्यातील भाविकांना महाकालेश्वर आणि उत्तर भारतातील दर्शन घेण्याची सुवर्ण संधी

पुढील लेख
Show comments