Marathi Biodata Maker

तुमच्या सोशल मीडियावर सरकारची नजर?

Webdunia
सोमवार, 4 जून 2018 (11:31 IST)
तुम्ही जर फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्‌सअ‍ॅप यासारख्या सोशल मीडियावर असाल, तर सावध राहा. केंद्रातील मोदी सरकार यापुढे सर्व सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाने एका खासगी कंपनीला कंत्राट देऊन असे सॉफ्टवेअर तयार केले आहे की, ज्याद्वारे तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाईल.
 
तुम्ही यूट्यूबवर काय पाहत आहात, व्हॉटस्‌अ‍ॅपवर तुम्हाला काय संदेश वा छायाचित्रे, व्हिडिओज येत आहेत वा तुम्ही पाठवत आहात, फेसबुकवर तुम्ही काय पोस्ट केली आहे, तुमच्या ईमेलद्वारे तुम्ही कोणाला व काय मेल केला आहे, त्यात काय लिहिले आहे, ही सर्व माहिती या सॉफ्टवेअरमुळे केंद्र सरकारला कळेल. या सर्वाचे सरकार रेकॉर्ड ठेवेल आणि जेव्हा वाटेल, तेव्हा रेकॉर्डमधील माहितीचा उपयोग केला जाईल.
 
त्याचा हॅब तयार करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाने 42 कोटी रुपयांची निविदाही दिली आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी हे काम सुरू होईल. त्याद्वारे तुमची माहिती, पत्ता, फोन व मोबाइल क्रमांक हा सारा डेटाही सरकारला मिळेल.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे महानगरपालिकेच्या होर्डिंग धोरणाला स्थगिती

ट्रम्प यांनी शस्त्रसंधीच्या मुदतवाढीची घोषणा केली

पंतप्रधान मोदींनी हुगळी नदीत नौकाविहार केला, छायाचित्रेही काढली आणि गंगेला बंगालचा आत्मा म्हटले

डोंबिवलीत स्वस्त फ्लॅट्सच्या नावाखाली ९३ लाख रुपयांची फसवणूक, बिल्डरसह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

सॅफ महिला चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेतून पाकिस्तानने माघार घेतली

पुढील लेख
Show comments