Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
, शुक्रवार, 10 जानेवारी 2020 (15:50 IST)
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. व्हॉट्‌सअ‍ॅपचे डार्कमोड फीचर सद्या काही मोजक्या युजर्सना उपलब्ध करून देण्यात आले आहे. अँड्रॉइड बीटा व्हर्जनवर काही दिवसांपूर्वीच हे फीचर उपलब्ध झालं आहे. सर्व युजर्सना हे फीचर उपलब्ध करून देण्यापूर्वी कंपनी त्याची सर्व स्तरावर चाचणी करत आहे. काही त्रुटी आढळून आल्यास त्या दुरुस्त करण्यात येणार आहेत.
 
डोळ्याला मोबाइल स्क्रीनमुळे होणारा त्रास निश्चितच कमी होणार आहे. रात्रीच्यावेळी मोबाइलवर पाहताना डोळ्याला त्रास होऊ नये यासाठी प्रामुख्याने या मोडचा उपयोग करण्यात येतो. हे डार्कमोड फीचर सर्व युजर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉट्‌सअ‍ॅपची जोरदार तयारी सुरू आहे. Whatsapp चे अपडेट देणार्‍या W-Betainfo ने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर सर्व युजर्सपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. कॅमेराने काढलेला फोटो व्हॉट्‌सअ‍ॅपवर शेअर करताना युजरना डार्कमोड फीचर दिसून येतं, असं W-Betainfoने म्हटलं. मात्र, सर्व युजर्ससाठी डार्कमोड हे फीचर कायमस्वरुपी कधीपर्यंत उपलब्ध करून दिले जाईल, याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय, iOS युजर्सना मात्र या फीचरसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. iOS वरील डार्कमोड फीचर हळूहळू अमलात आणले जाणार असून सध्या ते डेव्हलप करण्याचं काम सुरू आहे.
 
ळजड वरील डार्कमोडमध्ये सुधारणेची गरज आहे, असं W-Betainfo ने ट्विटमध्ये म्हटलं. डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whatsappमध्ये आलं खास फीचर हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन