suvichar

व्हॉट्सअॅपवर मर्यादा, एका वेळी फक्त पाच मॅसेज फॉरवर्ड करता येणार

Webdunia
शनिवार, 21 जुलै 2018 (09:09 IST)
अफवा आणि हत्या रोखण्यासाठी ग्राहकाला एका वेळी फक्त पाच मॅसेज फॉरवर्ड करता येतील अशी मर्यादा व्हॉट्सअॅप घालणार आहे. त्याचबरोबर ‘क्विक फॉरवर्ड’हे बटणही काढून टाकण्यात येणार आहे. ही मर्यादा केवळ भारतीय ग्राहकांसाठीच असेल. सध्या याची चाचपणी सुरू असून लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे.
 
देशात गेल्या काही महिन्यांत अफवा पसरवणे, त्याची परिणती जमावाकडून निरपराधांची हत्या होण्यात झाल्यामुळे सरकारने व्हॉटस्ऍपला दोनदा नोटीस पाठवून चांगलेच खडसावले होते. खोटी माहिती पसरवण्यात व्हॉट्सअॅप थेट हात नसला तरी त्यांना अशा घटनांमध्ये चिथावणी देण्याला जबाबदार धरून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा केंद्र सरकारने दिला होता. मुके साक्षीदार न बनता अफवा रोखण्यासाठी तत्काळ पावले उचला, असे आवाहनही सरकारने केले होते. त्या पार्श्वभूमीवर व्हॉटस्ऍपने हे पाऊल उचलले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

नाशिक अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा, घोटाळ्यात रूपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर खरातच्या भागीदार

माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपतींच्या पुतळ्यावरून वाद; कलम १४४ लागू; पोलीस बंदोबस्त तैनात

हवामान खात्याने आजही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला

राज्य सरकारने परवानगीशिवाय शाळांच्या नावात 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल', 'वर्ल्ड' किंवा 'युनिव्हर्सल' असे शब्द वापरण्यावर बंदी घातली

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शाळांमध्ये दररोज 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करण्याचा प्रस्ताव मांडला

पुढील लेख
Show comments