Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कर्करोगाच्या निदानासाठी नवे अँप

Webdunia
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2015 (10:46 IST)
टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कर्करोगाचे निदान व उपचारांसाठी मार्गदर्शक ठरणारे मोबाइल अँप्लिकेशन विकसित केले आहे. विशेषत: रुग्णाचा कर्करोग नेमक्या कोणत्या स्तरावर आहे; हे समजून घेण्यासाठी हे अँप उपयुक्त ठरणार आहे. ‘टीएनएम’ असे या अँपचे नाव आहे. या अँपमुळे देशभरातील डॉक्टरांना; विशेषत: भौगोलिकदृष्टय़ा दुर्गम भागात राहून रुग्णसेवा करणार्‍या डॉक्टरांना कर्करोगाचे निदान करण्याबरोबरच त्याची तीव्रता जाणून घेण्यासाठी मदत होईल. त्याचप्रमाणे 65 प्रकारच्या कर्करोगांपैकी कोणत्या कर्करोगाला कोणत्या प्रकारच्या आणि किती क्षमतेच्या औषधांची योजना करावी; याचे मार्गदर्शन या अँपमुळे मिळेल; असा दावा या अँपच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या डॉ. राजेंद्र बडवे आणि डॉ. पलक पोपट यांनी केला. हे अँप एकदा डाउनलोड केल्यानंतर त्याचा ऑफलाइन वापर करता येतो. हे अँप इंटरअँक्टिव्ह असून आवश्यक माहिती त्यात भरल्यानंतर 30 सेकंदात कर्करोगाची तीव्रता समजू शकते; अशी माहिती डॉ. मीनाक्षी ठाकूर यांनी दिली. हे अँप जगभरातील डॉक्टरांना विनामूल्य डाउनलोड करता येणार आहे. त्याच्या वापराबद्दल 19 देशांमध्ये चाचणी घेण्यात आली आहे. या अँपमध्ये डॉक्टरांबरोबरच रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांना उपयुक्त सुधारणा करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे प्रबोधन होणार आहे. रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कोणती काळजी घ्यावी; याची माहिती त्यात देण्यात येणार आहे. ही सुधारणा फेब्रुवारी 2016 पर्यंत करण्यात येईल; असे डॉ बडवे यांनी सांगितले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments