Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुगलवरूनही करता येणार खरेदी

Webdunia
शनिवार, 18 जुलै 2015 (12:11 IST)
लोकप्रियता कायम ठेवण्यासाठी गुगल आपल्या युझर्सना नवनव्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असते. ग्राहकोपयोगी सेवांमध्ये महत्त्वाची भर टाकत गुगलने ‘परचेसेस ऑन गुगल’ ही नवी संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. जगभरात, विशेषत: अमेरिकेत कुठलीही खरेदी करण्यापूर्वी स्मार्टफोनवरून संबंधित उत्पादनाची माहिती घेण्याचा ट्रेंड वाढतो आहे. साहजिकच खरेदी करताना किंवा खरेदीला जाण्यापूर्वी ग्राहक गुगलचा वापर करतात. ही बाब लक्षात घेत सर्च रिझल्टसोबतच त्याची ऑनलाइन खरेदी करण्याचे पर्याय ‘बाय ऑन गुगल’द्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. व्यावसायिक उत्पादनांच्या जाहिराती, त्यांचे रेटिंग आणि जवळच्या कोणत्या रिटेल स्टोअरमध्ये ते उपलब्ध आहेत, याची माहिती मोबाइलवर येण्यास सुरुवात झाली आहे. ‘परचेस ऑन गुगल’ हा त्याचाच पुढचा भाग आहे. पिंटरेस्ट या वेबसाइटने गेल्या महिन्यात ‘ऑनलाइन बुलेटिन बोर्ड’च्या माध्यमातून अमेरिकेतील आयफोन आणि आयपॅड ग्राहकांना उत्पादन खरेदीची सेवा उपलब्ध केली आहे. खेळण्यांपासून खाण्यापर्यंत सर्व प्रकारची उत्पादने पिंटरेस्टवर सचित्र आणि पूर्ण माहितीसह दिसतात. त्यामुळे अमेरिकेतील महिलावर्गात या साइटची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. गेल्या महिन्यात सोशल नेटवर्किग साइट फेसबुकनेही युझर्ससाठी ‘बाय बटन’ची चाचणी घेतली होती. सध्या आम्ही ‘परचेस ऑन गुगल’च्या प्राथमिक अवस्थेत आहोत. आमच्याकडे सध्या ग्राहक अगदीच कमी असले तरी गुगलची लोकप्रियता आणि स्मार्टफोन्सचा वाढता वापर पाहता, आमची ही संकल्पना यशस्वी होईल, असा विश्वास गुगल शॉपिंग मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष जोनाथन अफेअरनेस यांनी व्यक्त केला आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments