Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेसबुक, व्हाट्सअँपला देणार एजे-बुक टक्कर

Webdunia
बुधवार, 25 नोव्हेंबर 2015 (09:41 IST)
वडिलांचे चप्पलांचं दुकान, घरात कॉम्प्युटरचा फारसा संबंध नाही. मात्र, असे असताना अजिंक्य लोहकरेनं गगनभरारी घेतलीय.अजिंक्य लोहकरे. अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव इथं कॉम्प्युटर इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतोय. 
 
अजिंक्यने फिनिक्स भरारी घेत जगभरातल्या टॉप आयटी कंपन्यांना आपल्या दारात उभं केलंय. याला निमित्त ठरलंय ते अजिंक्यनं बनवलेलं एजे बुक हे अँप आणि सॉफ्टवेअर. व्हॉट्सअँप किंवा फेसबुकला टक्कर देण्याची क्षमता असलेल्या या सॉफ्टवेअरची दखल जगानं घेतली. फेसबुकनं तर अजिंक्यला 1 कोटी 67 लाखांची ऑफर दिली. विप्रो, 
 
इन्फोसिससारख्या कंपन्यांचीही ऑफर त्याच्याकडे होती. त्यामुळं त्यानं वेट अँन्ड वॉच धोरण अवलंबलं. त्याचं फळही त्याला मिळालं.दोन कोटी रुपये वार्षिक पॅकेज आणि इतर सवलती देऊन अँपलनं अजिंक्यला आपलंसं केलं. 
 
डिसेंबरमध्ये तो अँपलच्या मुख्य कार्यालयात रुजू होणार आहे. व्हॉटसअँपमध्ये फक्त 100 एमबीपर्यंत डाटा शेअरिंग करता येते. मात्र, एजबुकमध्ये 2 जीबीपर्यंत डाटा शेअरिंग होऊ शकतो. विशेष म्हणजे यात इंटरनेट कनेक्शन हवेच असे नाही. इंटरनेट नसताना साडेतीन किलोमीटरपर्यंतच्या अंतरात दोन डिव्हाईस कनेक्ट होऊन डाटा शेअरिंग होऊ शकते. एखादा मॅसेज फॉरवर्ड करताना तो प्रत्येक वेळेस फॉरवर्ड करावा लागतो. तेच एजेबुकमध्ये सर्वाना एकदाच फॉरवर्ड करण्याची सुविधा आहे. फेसबुक किंवा व्हॉट्सअँप मॅसेजशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीने यात फिचर उपलब्ध असून 2016 मध्ये हे कार्यान्वित होऊ शकते.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments