Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फ्लिपकार्टवर आयआयटीयनच्या ‘खरेदीसाठी’ स्पर्धा

Webdunia
मंगळवार, 8 मार्च 2016 (17:00 IST)
फ्लिपकार्टमध्ये नोकरी मिळावी यासाठी आपला रेझ्युमे त्यांच्याच वेबसाइटवर टाकून स्वत:लाच ‘विकू’ पाहणार्‍या आकाश मित्तल या तरुणाला फ्लिपकार्टने बोलवणं धाडलं नसलं तरी अन्य बर्‍याच कंपन्यांकडून त्याला ऑफर्स आल्या आहेत. नोकरी मिळवण्यासाठी आकाशने शक्कल लढवली होती, त्याची अनेकांनी दाद दिली आहे. 
 
आयआयटी खडगपूर येथून शिकलेल्या आकाशने फ्लिपकार्टच्या कॅम्पस इंटरव्ह्यू आपला रेझ्युमे दिला. मात्र अंतिम 1500 जणांमध्ये त्याचा रेझ्युम निवडण्यात आला नव्हता. आजच्या स्पर्धेच्या युगात तुम्हाला तुमचं मार्केटिंग करावं लागतं, हे लक्षात घेत त्याने आपला फोटो कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड केला आणि त्यासोबत आपला रेझ्युमेही जोडला. 
 
स्वत:चं अशा अनोख्या पद्धतीने मार्केटिंग करण्याचं त्याचं तंत्र अनेक कंपन्यांना भावलं. विविध कंपन्यांनी त्याला ऑफर्स देऊ केल्या. यामध्ये एक ऑफर चीफ टेक्नोलॉजी ऑफिसरचीदेखील आहे. आकाश म्हणाला की, सिक्स पॉइंटर (सीजीपीए) असल्याने मी यामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही हे मला माहीत होतं. म्हणून मी नवा मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, फ्लिपकार्टने यासंदर्भात काही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र आकाशला आशा आहे की, निदान आपल्या अनोख्या प्रयत्नाचे कंपनीकडून कौतुक होईल.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments