Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मार्क झुकेरबर्गला फेसबुकसाठी मिळाले एक गोंडस ‘लाइक’

Webdunia
मंगळवार, 4 ऑगस्ट 2015 (12:55 IST)
अवघ्या जगाला वेड लावणारं फेसबुक जन्माला घालणार्‍या मार्क झुकेरबर्गच्या घरी लवकरच एक नवीन पाहुणा येणार आहे. मार्क झुकेरबर्ग सध्या सज्ज होतोय ती ‘बाबांची’ भूमिका निभावण्यासाठी.. मार्कने स्वत: फेसबुकवर आपल्या पत्नीसह एक फोटो पोस्ट करून ही गोड बातमी दिलीय. मार्कला आपल्या घरी एक छोटीशी परी येणार असं वाटतंय. त्याची बायको प्रिसलिला डॉक्टर तसेच शिक्षणतज्ज्ञ आहे.’ हा आमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय आहे. आधी आम्हाला जगातील लोकांच्या जीवनाला स्पर्श करण्याची संधी मिळाली.. आता आमचं लक्ष आमच्या मुलाचे तसेच येणार्‍या पिढीचे जीवन सुंदर बनवण्यासाठी आहे असं मार्कनं म्हटलंय.

माझी पत्नी प्रिसलिला आणि होणारं बाळ दोघांचीही प्रकृती चांगली आहे. मी येणार्‍या बाळाला बघण्यासाठी खूपच उत्सुक आहे. अल्ट्रासाऊंडमध्ये बाळानं आपला अंगठा उंचावून फेसबुकला लाइक केल्याचं दिसतंय. त्यामुळे माझ्यानंतर हा सगळा कारभार तीच सांभाळू शकते असा माझा विश्वास आहे असं हर्षोल्हासित मार्क झुकेरबर्गनं आपल्या फेसबुक पोस्टवर म्हटलंय. याआधी प्रिसलिला हिचे तीन मिसकॅरेज झाले होते पण यावेळी हा धोका दिसत नाही असेही मार्क याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments