Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वैज्ञानिकांनी बनवली जगातील सर्वात लहान मायक्रोचिप

Webdunia
जगातील सर्वात लहान मायक्रोचिप वैज्ञानिकांनी तयार केली असून त्यात 1000 संस्कारक आहेत. त्याच्या मदतीने 1.78 महापद्म गणिती सूचनांवर अंमलबजावणी करता येते. या ऊर्जाकार्यक्षम चिपचे नाव ‘किलोकोअर चिप’ असे असून त्यात 621 दशलक्ष टान्झिस्टर्स आहेत. 
 
आमच्या मते 1000 संस्कारक असलेली ही जगातील पहिलीच मायक्रोचिप आहे. त्याचा गणनाचा वेगही अधिक आहे, असे कॅलिफोर्निया विद्यापीठाचे बिव्हन बास यांनी सांगितले. त्यांनीच या मायक्रोचिपची रचना केली आहे. अनेक संस्कारक असलेल्या चिप सध्याही आहेत, पण त्यात तीनशेच्या संस्कारक (प्रोसेसर्स) नाहीत. त्यातील बरेचसे संशोधनासाठी आहेत विक्रीसाठी नाहीत. 
 
प्रत्येक संस्कारक त्याची एक स्वतंत्र आज्ञावली चालवतो. प्रत्येक संस्कारक स्वतंत्रपणे काम करू शकतो हा वेगळा दृष्टिकोन असून यात एक सूचना व बहुविध माहितीस्थाने असा प्रकार असतो. ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिटमध्ये त्याचा वापर करतात. एकच काम अनेक लहान तुकडय़ांत रुपांतरित करून विविध संस्कारक समांतर चालवता येतात. त्यात कमी ऊर्जेत जास्त काम करता येते. प्रत्येक संस्कारक हा स्वतंत्रपणे कालबद्ध असतो त्यामुळे तो ऊर्जा साठवण्यासाठी गरज नसताना आपोआप बंद होऊ शकतो, असे विद्यापीठाचे डॉक्टरेटचे विद्यार्थी ब्रेन्सट बोहनेनस्थिल यांनी म्हटले आहे. 
 
यातील कोअर्स सरासरी 1.78 गिगाहर्टझ् कंप्रतेला काम करतात व एकमेकांकडे माहिती हस्तांतरित करतात. चिप अनेक ऊर्जासक्षम कोअर्स यात वापरले जातात. 1000 संस्कारक 115 अब्ज गणने एका सेकंदाला करतात व त्यात 0.7 वॅट ऊर्जा लागते. एका एए बॅटरीपेक्षा कमी बॅटरी त्याला लागते. या चिपसाठी अनेक उपयोजने विकसित केली असून त्यात वायरलेस कोडिंग, एनक्रिप्शन व इतर वैज्ञानिक माहिती उपयोजनांचा तसेच डेटा सेंटर रेकॉर्ड प्रोसेसिंग यांचा समावेश आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments