Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

’विंडोज 10’ विनामूल्य उपलब्ध

Webdunia
गुरूवार, 4 जून 2015 (11:30 IST)
विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वापरत असलेल्या जगभरातील युजर्ससाठी 29 जुलैपासून ‘विंडोज टेन’ विनामूल्य उपलब्ध होणार आहे. अलीकडेच मायक्रोसॉफ्टच्यावतीने त्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वीच्या ‘विंडोज’च्या व्हर्जनमधून वगळण्यात आलेल्या स्टार्ट मेन्यूचा ‘विंडोज टेन’मध्ये पुन्हा समावेश करण्यात आला आहे.
 
स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी तसेच अधिकाधिक युजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी मायक्रोसॉफ्टने जानेवारीमध्ये विंडोज 7 आणि विंडोज 8.1 वापरकत्र्यांसाठी विनामूल्य अपग्रेडेशनची सुविधा देण्याची जानेवारीमध्ये घोषणा केली होती. ‘विंडोज टेन’ हे होम, मोबाइल, प्रो, एंटरप्राईज आणि एज्युकेशन एडिशनमध्ये उपलब्ध आहे. त्यापैकी होम एडिशनमध्ये अधिकाधिक ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ती डेस्कटॉप पीसीज्, लॅपटॉप्स आणि अन्य डिव्हाईसेसमध्ये वापरता येणार आहे. ‘विंडोज टेन’मध्ये नव्या सुविधांसह विंडोज एज ब्राऊजर, चेहरा ओळखण्याची सुविधा, बोटाच्या ठशांद्वारे लॉगीनची सुविधा यासह ङ्खोटो, नकाशे, मेल, कॅलेंडर आदींसाठी विविध विंडोज अँप्सही असणार आहेत. तर विंडोज प्रो एडिशनही व्यावसायिक वापरासाठी उपयोगी ठरणार असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments