सुरवातीच्या चित्रपटात ती एक ग्लॅमर डॉल म्हणून दिसत होती आणि बऱ्याच सफल चित्रपटाची ती भागीदार राहिली आहे. तिच्या चेहऱ्यात असणाऱ्या गोडव्यामुळे करोडो चाहत्यांसोबत सलमान खान देखील तिचा दिवाना झाला आहे. कतरीनाला माहीत होते की जर बॉलीवूडमध्ये टिकून राहायचे असेल तर अॅक्टिंगशिकणे फारच गरजेचे आहे. त्यासाठी तिने बरेच प्रयत्न केले त्यामुळे फिल्मकार तिला घेऊन राजनीती, जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि मेरे ब्रदर की दुल्हन सारखे चित्रपट तयार करत आहे.
कतरीना सोबत चित्रपट करणारे इमरान खान तिच्या कामाबद्दल असणारी आवड बघून आश्चर्यचकित आहे. तो म्हणाला की कतरीना शूटिंग सुरू होण्याच्या दोन तास अगोदरच पूर्ण तयारी करून घेते. कतरीनाला पूर्ण माहीत आहे की, ती प्रियंका चोप्रा व करीना कपूरपेक्षा अभिनयाच्या बाबतीत मागे आहे, म्हणून ती अधिक मेहनत करून तिच्यात असलेल्या कमजोरीला दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. आता अॅक्ट्रेसच्या रूपात बॉलीवूडमध्ये ती आपली वेगळी ओळख बनवण्यात यशस्वी झाल्यामुळे यश चोप्रा सारख्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा तिला मोका मिळाला आहे. 16 जुलै रोजी कतरीना 27 वर्षाची पूर्ण होत आहे, त्यासाठी तिचे अभिनंदन!