Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कतरीना आणि सलमानचे लग्न होणार काय?

Webdunia
IFMIFM
कतरीना कैफने सलमान खानच्या जीवनात प्रवेश केला तेव्हा ऐश्वर्याच्या विरहाने सलमान पोळलेला होता. 'देवदास' चित्रपट ऐश्वर्याने केला खरा, पण इकडे देवदास झाला मात्र सलमान. योगायोगाने कतरीना आणि सलमानचे सूर जुळले आणि कतरीनाच्या करीयरलाही 'लिफ्ट' मिळाली. हळूहळू सलमानची गर्लफ्रेंड म्हणून ती ओळखली जाऊ लागली.

कतरीना आणि सलमान दोघेही आपल्या खासगी आयुष्याची चर्चा करत नाही. पण दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलेत हे दिसून येते. दोघांत वयाचे अंतर बरेच आहे. पण कतरीनालाच अडचण नसेल तर इतरांचे काय? सलमानने सांगितलं, तर कतरीना करीयर सोडून त्याच्याशी लग्न करून घरही बसेल.

सलमानच्या कुटुंबात कतरीना सून म्हणून चालणार आहे. खरं तर सलमान म्हणतो ते त्याच्या कुटुंबियांना मान्य असते. म्हणूनच संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय याही सून म्हणून खान कुटुंबियांना पसंत होत्या. पण दुर्देव. यातली एकही त्यांच्या घरी येऊ शकली नाही.

आता सलमान आणि कतरीना यांच्या लग्नाची तारीख ठरल्याच्या बातम्या वारंवार उडत असतात. पण दरवेळी त्या अफवाच ठरतात. त्यामुळे यांचे लग्न नक्की होणार काय? हा प्रश्न आहे की सलमानच्या मागच्या नायिकांच्या यादीत तिचेही नाव समाविष्ट होणार हे पहायचे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

Show comments