rashifal-2026

बोल कतरीनाचे

Webdunia
IFM
' मी इथे आले तेव्हा मला हिंदी अजिबातच येत नव्हती. पण मी आता हिंदी वाचू शकते बोलू शकते. माझ्या दृष्टिने ही माझी कमाई आहे.'

' सलमान खान हा ज्येष्ठ अभिनेता आहे. त्याच्याकडून मला बरेच काही शिकायला मिळाले. तो अतिशय नेमकेपणाने आणि झोकून देऊन काम करतो.'

अशा गोष्टी ऐकून गंमत वाटते ( बॉलीवूडमध्ये सर्वांत मधूर ओठ असल्याबद्दल कतरीनाची निवड झाली. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना.)

' मी माधुरी दीक्षितला कधी भेटले नाही. पण पडद्यावर ती मला खूप आवडते. मला मनिषा कोईरालाही खूप सुंदर वाटते.'

मी खूप मनस्वी आहे आणि कर्कवृत्तीचीही. एखादी छोटी गोष्टही माझा 'मूड' बदलू शकते. माझे कामही त्यावरच चालते. पण तरीही मी माझ्या कामाशी एकनिष्ट असते नि पझेसिव्हही.

' आम्ही एकमेकांच्या खासगीपणाचा आदर करतो. मी माझ्या व्यावसायिक आयु्ष्याबद्दल प्रसार माध्यमांना उत्तरदायी आहे, माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नाही. ( सलमान खानविषयी विचारलेले प्रश्न टाळताना दिलेले स्पष्टिकरण.)

कमीत कमी कपडे परिधान करणे, अंगप्रदर्शन करणे ही काही माझी 'स्टाईल' नाही. त्यामुळे मिळणारे 'सेक्स सिंबॉल' हे विशेषणही मला भूषणावह वाटत नाही. मला चांगले काम करायचे आहे. त्यामुळे अशी फालतू 'विशेषणे' लावून घेण्यात मला रस नाही. 'सेक्स' विकला जातो हे खरेय. पण फार थोड्या प्रमाणात आणि दीर्घकाळ नाही. फिल्ममेकर्सनेही हे लक्षात घ्यायला हवे. अंगप्रदर्शन हे प्रसंगानुरूप हवे, कोणाला उगाचच उत्तेजित करण्यासाठी म्हणून नको. अनेक भारतीय महान चित्रपटात सेक्स औषधालाही सापडत नाही. मी भारतीय संस्कृती आणि समाजातच मोकळेपणाने राहू शकते.
सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

करूर चेंगराचेंगरी प्रकरणी सीबीआयने थलापती विजयला नोटीस बजावली

Tourist Cities in Maharashtra : महाराष्ट्रातील मोठी शहरे आणि त्यांची मुख्य आकर्षणे

धुरंधरच्या विक्रमी यशानंतर, रणवीर सिंग 'प्रलय' मध्ये झोम्बी अवतार साकारण्यास सज्ज

भाजप नेत्याच्या विधानावर रितेश देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली

Doctor Patient Joke स्वर्गवासी