Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हॅपी बर्थडे कतरीना

वेबदुनिया
शनिवार, 16 जुलै 2011 (12:42 IST)
2003 मध्ये बूम रिलीज झाल्यानंतर कुणाला ही विश्वास नव्हता की या चित्रपटाची तिसरी हिरॉईन कतरीना कैफ येणाऱ्या वर्षांत बॉलीवूडची मल्लिका बनणार आहे. त्या वेळेस कतरीना हिंदीचे 'कखग' ही ओळखत नव्हती. अभिनय आणि तिच्यात छत्तिसाचा आकडा होता. येऊन जाऊन तिच्याजवळ फक्त सुंदर चेहराच होता. पण अनुशासन, समर्पण, मेहनत आणि थोडासा सलमानचा साथ घेऊन कतरीनाने आपल्या कमजोरींवर काबू घेऊन आपली एक वेगळी ओळख बनवली आहे.
WD

सुरवातीच्या चित्रपटात ती एक ग्लॅमर डॉल म्हणून दिसत होती आणि बऱ्याच सफल चित्रपटाची ती भागीदार राहिली आहे. तिच्या चेहऱ्यात असणाऱ्या गोडव्यामुळे करोडो चाहत्यांसोबत सलमान खान देखील तिचा दिवाना झाला आहे. कतरीनाला माहीत होते की जर बॉलीवूडमध्ये टिकून राहायचे असेल तर अ‍ॅक्टिंगशिकणे फारच गरजेचे आहे. त्यासाठी तिने बरेच प्रयत्न केले त्यामुळे फिल्मकार तिला घेऊन राजनीती, जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि मेरे ब्रदर की दुल्हन सारखे चित्रपट तयार करत आहे.

कतरीना सोबत चित्रपट करणारे इमरान खान तिच्या कामाबद्दल असणारी आवड बघून आश्चर्यचकित आहे. तो म्हणाला की कतरीना शूटिंग सुरू होण्याच्या दोन तास अगोदरच पूर्ण तयारी करून घेते. कतरीनाला पूर्ण माहीत आहे की, ती प्रियंका चोप्रा व करीना कपूरपेक्षा अभिनयाच्या बाबतीत मागे आहे, म्हणून ती अधिक मेहनत करून तिच्यात असलेल्या कमजोरीला दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. आता अ‍ॅक्ट्रेसच्या रूपात बॉलीवूडमध्ये ती आपली वेगळी ओळख बनवण्यात यशस्वी झाल्यामुळे यश चोप्रा सारख्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा तिला मोका मिळाला आहे. 16 जुलै रोजी कतरीना 27 वर्षाची पूर्ण होत आहे, त्यासाठी तिचे अभिनंदन!

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

Show comments