Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाचे 5 मुख्य कारण

5 main reasons
Webdunia
गुरूवार, 23 मे 2019 (14:44 IST)
लोकसभा निवडणुकीत भाजप नीत एनडीएने बर्‍याच खोट्या अंदाजांना नाकारतं बहुमत मिळविले आहे. काँग्रेसच्या तारकशीत प्रियंका गांधी वाड्रा आणि 'चौकीदार चोर है' सारखे बाण देखील पूर्णपणे अपयशी ठरले. 21 राज्यांमध्ये तर काँग्रेस आपले खाते उघडण्यात अयशस्वी ठरली. तर जाणून घेऊ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पराभवाचे 5 मोठे कारण...   
 
ट्रम्प कार्ड अयशस्वी झाले : काँग्रेसने या निवडणुकीआधी प्रियंका गांधी यांना महासचिव नियुक्त करून पश्चिमी उत्तरप्रदेशाची कमान सोपवली होती. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी ट्रम्प कार्ड असे मानण्यात येत होते. देशातील बर्‍याच राज्यांमध्ये त्यांचा रोड शो देखील झाला होता. त्यांच्या निवडणूक रॅलीजमध्ये गर्दी देखील बघायला मिळाली होती, पण त्या गर्दीने त्यांना मत काही मिळवून दिले नाही. या प्रमाणे काँग्रेसचा मोठा दाव निष्फळ झाला.   
 
नकारात्मक प्रचार : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात कुठलीही कसर ठेवली नव्हती. राहुल यांनी राफेलवर त्यांना घेरून 'चौकीदार चोर है'चा नारा दिला. लोकांना त्यांचे वक्तव्य पटले नाही आणि त्यांचा हा दाव उलटा पडला. जर काँग्रेस अध्यक्षाने नकारात्मक प्रचार केला नसता तर त्यांना काही जागांवर फायदा मिळाला असता.  
 
मुद्द्यांचा अभाव : या निवडणुकीत मोदी सरकारच्या विरुद्ध काँग्रेसजवळ कुठलाही मुद्दा नव्हता. राहुल यांनी राफेलला मोठा मुद्दा बनवला पण बालाकोट सर्जिकलनंतर हा मुद्दा देखील फेल झाला. महागाई आणि भ्रष्टाचार हे निवडणुकीचे मुद्दे बनू शकले नाही. भाजपने पाच वर्ष बरेच काम केले होते, लोकांसाठी आयुष्यमान भारत योजना, स्मार्ट सिटी समेत बर्‍याच योजना आणल्या होत्या. शेतकर्‍यांच्या खात्यात देखील पैसे आले म्हणून राहुल यांचे 'अब होगा न्याय' देखील लोकांना समजले नाही.  
 
यूपी मध्ये वेगळ्या निवडणुका लढणे : या निवडणुकीत सपा आणि बसपाने मिळून निवडणुका लढल्या, पण काँग्रेसने येथे काही जागा सोडून सर्व जागांवर आपले उमेदवार मैदानात आणले. त्यामुळे मतांची वाटणी झाली आणि काँग्रेसला याचे दुष्परिणाम भोगावे लागले.  
मोदी हे सर्वांवर भारी : या निवडणुकीत पीएम मोदी हा सर्वात मोठा चेहरा होता, त्यांच्याजवळ सर्वात मोठे मुद्देही होते आणि ही निवडणुक त्यांच्या नावावरच लढण्यात आली. मोदी हे विरोधी सर्व नेत्यांवर भारी पडले. त्यांच्यासमोर एकाचीही चालली नाही. देशाच्या जनतेला त्यांच्याविरुद्ध बोललेले ऐकही शब्द आवडले नाही आणि सर्व मोदी विरोधी अयशस्वी झाले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

महाराष्ट्रात लवकरच ई-बाइक टॅक्सी सुरू होणार, राज्य सरकारने दिली मंजुरी

भारतातील या राज्यात एक जोरदार भूकंप झाला,लोक घराबाहेर पडले

वक्फ विधेयकावर गोंधळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्या वर घणाघात टीका

महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

पुढील लेख
Show comments