rashifal-2026

महाराष्ट्रात मतमोजणीस सुरुवात

वेबदुनिया
महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांची मतमोजणीस सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली असून, दुपारी चारच्या सर्व निकाल लागण्याची अपेक्षा आहे. मतमोजणीस शांततेत सुरुवात झाल्याचे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांसाठी वेगवेगळी टेबल्स असतील. विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी आधी होईल. त्यानंतर एकूण लोकसभा मतदारसंघाची मोजणी करून निकाल जाहिर केला जाईल. सर्वांत आधी टपालाने आलेल्या मतांची मोजणी करण्‍यात येणार आहे.

राज्यात २७ ठिकाणी मतमोजणी होत आहे. काही ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा जास्त जागांची मतमोजणी होत आहे. पुणे, मावळ, बारामती, व शिरूर यांची मतमोजणी पुण्याच्या शिवाजीनगर येथील धान्य गोदामात केली जात आहे. सोलापूर येथे सोलापूर व माढा मतदारसंघाची मतमोजणी केली जात असून, माढातून शरद पवार रिंगणात आहेत.

मुंबईतील सहा लोकसभा जागांपैकी उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मध्य मुंबईची मतमोजणी गोरेगाव येथील नेस्को परिसरात तर मुंबई उत्तर पूर्वची मतमोजणी विक्रोळीत केली जात आहे. दक्षिण मध्य मुंबईची मतमोजणी रूपारेल कॉलेजमध्ये तर दक्षिण मुंबईची मतमोजणी एलिफिस्टन कॉलेजमध्ये करण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील पालघर मतदारसंघाची मतमोजणी जव्हार येथे केली सकाळी सुरु झाली असून, ठाणे मतदारसंघाची ठाण्यातच तर भिवंडी व कल्याणची मतमोजणी कल्याण पश्चिममध्ये करण्‍यात येत आहे.

जळगावमध्ये जळगाव व रावेरची, नागपूरमध्ये नागपूर व रामटेक, नाशिकमध्ये नाशिक व दिंडोरी, अहमदनगरला नगर व शिर्डी, कोल्हापूरमध्ये कोल्हापूर व हातकणंगले येथील मतमोजणी होईल.

भंडारा व गोंदियाची भंडारा, गडचिरोली व चिमुरची गडचिरोलीमध्ये,यवतमाळ व वाशिमची यवतमाळमध्ये मतमोजणी होईल. कोकणातील रायगडची अलिबागमध्ये तर सिंधुदुर्गची रत्नागिरीत मतमोजणी होईल.बाकीच्या मतदारसंघांची मतमोजणी तिथेच होईल.
सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ! १८ कॅरेट सोने २५०० रुपयांनी वाढले, तर चांदी २.११ लाख रुपयांनी ओलांडली

LIVE: नितीन गडकरी यांनी देशभरात बहु-लेन मुक्त-प्रवाह टोल प्रणाली लागू करण्याची घोषणा केली

नितीन गडकरी यांनी देशभरात बहु-लेन मुक्त-प्रवाह टोल प्रणाली लागू करण्याची घोषणा केली

"सूर्यनमस्कार घातल्याने मुस्लिमांचे काय नुकसान होईल?", आरएसएसचे दत्तात्रय होसाबळे यांचे मोठे विधान

मुंबईच्या बेलापूर मेट्रो स्टेशनवर भीक मागणाऱ्या वृद्ध महिलेने दिवंगत क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांची पत्नी असल्याचा केला दावा

Show comments