Marathi Biodata Maker

अटल बिहारी यांचा संक्षिप्त परिचय

Webdunia
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018 (10:54 IST)
* 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशात ग्वाल्हेर येथे शिक्षकाच्या घरी जन्म  
 
* आईचे नाव कृष्णादेवी.
 
* बी.ए.- व्हिक्टोरिया कॉलेज ग्वाल्हेर (सध्याचे नाव लक्ष्मीबाई कॉलेज)
 
* एम.ए. (राज्यशास्त्र), डी.ए.व्ही. कॉलेज, कानपूर
 
* 1942 मध्ये वयाच्या 18व्या वर्षी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय, भारत छोडो आंदोलनात सहभाग
 
* 1947 मध्ये राष्ट्रीय स्वंसेवक संघात पूर्णवेळ स्वंसेवक म्हणून दाखल.त्याचवेळी त्यांचा पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश. राष्ट्रधर्म या हिंदी मासिकेचे व पाञ्चजन्य या हिंदी साप्ताहिकाचे संपादक आणि स्वदेश, वीरअर्जुन या दैनिकांचे संपादक म्हणूनही काम केले. 
 
* 1957 मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या दुसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीत उत्तर प्रदेशातील बलरापूर येथून प्रथम  लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर ते 1991 ते 2009 पर्यंत लखनौमधून भाजपचे खासदार म्हणून निवडून येत होते. 10 वेळा लोकसभेवर तर 2 वेळा राज्सभेवर निवडून आले आहेत.
 
* 1977 मध्ये पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री झाले. त्यांनी युनोत प्रथमच हिंदीत भाषण केले. 
 
* भारतीय जनसंघाचे संस्थापक शामप्रसाद मुखर्जी यांचे शिष्यत्व पत्करले आणि 1968 ते 1973 या काळात ते जनसंघाचे अध्यक्ष झाले. 
 
* 1980 ते 1986 भाजपचे अध्यक्ष.
 
* 1996 मध्ये ते पंतप्रधानपदी विराजान झाले. परंतु, इतर पक्षांनी पाठिंबा काढल्यामुळे त्यांचे सरकार 13 दिवसांचे अल्पायुषी ठरले. 
 
* 19 मार्च 1998 मध्ये पुन्हा भाजपप्रणीत आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि वाजपेयी दुसर्‍यांदा  पंतप्रधान झाले. परंतु, एका मताने अविश्वास ठराव हरल्यामुळे त्यांना पाउतार व्हावे लागले. ते 13 महिने पंतप्रधानपदावर होते. 
 
* मे 1998 मध्ये पोखरण अणुचाचणी घेण्याचे आदेश वाजपेयी यांनी दिले आणि चाचणी यशस्वी ठरली. 
 
* ऑक्टोबर 1999 पुन्हा भाजपप्रणीत रालोआ सत्तेवर आली आणि वाजपेयी तिसर्‍यांदा पंतप्रधान झाले. 19 मे 2004 पर्यंत म्हणजे 5 वर्षाचा कालावधी पूर्ण केला. 
 
* 2005 मध्ये सक्रिय राजकारणातून निवृत्त होणची घोषणा. 
 
* 2015 मध्ये त्यांना 'भारतरत्न' देऊन गौरविणत आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका धर्मशाळेत आमनेसामने येतील

ईव्हीएम सुरक्षेवरून वाद निर्माण; स्ट्राँग रूम परिसरात जॅमर बसवण्याच्या मागणीसाठी उमेदवारांचे उपोषण

महायुती विरुद्ध लोकशाही! संजय राऊत यांचा विरोधी पक्षनेत्यावर हल्ला बोल

मनरेगाचे नाव बदलण्यावरून काँग्रेसची टीका अयोग्य: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

LIVE: नाशिकमधील गडकरी चौकातील आयजीपी कार्यालयाच्या आवारात बिबट्या घुसला

पुढील लेख
Show comments