Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'अक्षय कुमार', जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रीटींची यादीत

akshay kumar
Webdunia
मंगळवार, 17 जुलै 2018 (15:30 IST)
‘फोर्ब्स’नं नुकतीच world’s 100 highest paid entertainers अर्थात जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रीटींची यादी जाहीर केली. जगभरातील मनोरंजन, संगीत, खेळ यांसारख्या विविध क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या १०० सेलिब्रिटीची नावं या यादीत आहेत. यात भारतातील दोन अभिनेत्यांच्या नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे शाहरुख आणि आमिरला मागे टाकत अक्षय कुमारनं या यादीत स्थान पटकावलं आहे. जगभरातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलीब्रिटींच्या यादीत अक्षय कुमार ७६ व्या स्थानी आहे.
 
अनेक सामाजिक प्रश्नांवर आधारित चित्रपटांमध्ये अक्षयनं काम केलं. चित्रपटाच्या माध्यामातून त्यानं हे प्रश्न पुढे नेले आहेत असं कौतुक फोर्ब्सनं केलं आहे. अक्षयचं एकूण उत्पन्न ४०.५ मिलिअन डॉलर म्हणजे एकूण अडीच अब्जाहून अधिक असल्याचं फोर्ब्सनं म्हटलं आहे. अक्षयनंतर या यादीत ८२ व्या क्रमांकावर  सलमान खानच्या नावाचा समावेश आहे. सलमानची एकूण कमाई ही ३७.७ मिलिअन डॉलर म्हणजे २ अब्जाहून अधिक असल्याचं म्हटलं जातं आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

सर्व पहा

नवीन

उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे जाणारी प्रत्येक फाईल आधी एकनाथ शिंदे पास करतील, महाराष्ट्रात नवा नियम

घटस्फोटानंतर मुलाच्या जन्म प्रमाणपत्रातून पालकांचे नाव काढून टाकता येते का? मुंबई उच्च न्यायालयाय म्हणाले...

LIVE: भूकंपामुळे महाराष्ट्राची जमीन पुन्हा हादरली

वक्फ विधेयक लोकसभेत मंजूर

भूकंपामुळे महाराष्ट्राची जमीन पुन्हा हादरली, सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले

पुढील लेख
Show comments