Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता पुरुष आयोगही नेमण्याची मागणी, पुरुषांचा मोठा पाठिंबा

Webdunia
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 (16:11 IST)
अनेकदा केवळ महिलांवरच अत्याचार होतात असं नाहीये तर महिलांकडूनही पुरुषांवर छळ केला जातो हे देखील सत्य आहे. त्यामुळेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुषांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुरुष आयोगही नेमला जावा अशी मागणी करण्यात आली आहे. भाजपाचे खासदार हरी नारायण राजभर यांनी ही मागणी केली आहे.
 
महिलांवर अत्याचार झाला तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी देशात अनेक संस्था कार्यरत आहेत, याशिवाय महिलांसाठी राष्ट्रीय आयोगही आहे. मात्र, तसा आयोग पुरुषांसाठी नाही. महिलांकडून होणाऱ्या छळामुळे पुरुषही आत्महत्या करताहेत. पुरुषांवर अनेक खोटे गुन्हे नोंदविले जात आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुषांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुरुष आयोग नेमण्यात यावा अशी मागणी राजभर यांनी केली आहे.
 
याबाबत अनेक पुरुषांनी या मुद्द्यासाठी पाठींबा दिला. जवळपास 5 हजारापेक्षा जास्त पुरूषांचे मला देशाच्या विविध भागांतून मेसेज आले, मेसेज करणाऱ्यांपैकी काहीजण तर परदेशातीलही असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments